
Delhi liquor policy case : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. मद्य अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात सिसोदियांनी केलेला जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला आहे.
मनीष सिसोदिया (Manish Sisodia) सध्या दिल्लीतील मद्य अबकारी धोरण घोटाळा प्रकरणात तुरुंगात आहेत. त्यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) आव्हान दिले होते. कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र, दिल्ली हायकोर्टाकडूनही सिसोदियांना दिलासा मिळू शकलेला नाही. (Latest Marathi News)
दिल्ली हायकोर्टाने सिसोदियांचा जामीन अर्ज फेटाळतानाच महत्वाची टिप्पणी केली आहे. सिसोदिया यांच्याविरोधात खूपच गंभीर आरोप आहेत. या प्रकरणातील त्यांचा व्यवहारही योग्य नाही. ते साक्षीदारांना प्रभावित करू शकतात. त्यामुळे त्यांना जामीन दिला जाऊ शकत नाही, असे कोर्टाने जामीन अर्ज फेटाळताना नमूद केले आहे. (Breaking Marathi News)
मनीष सिसोदियांनी कनिष्ठ न्यायालयाच्या (Court) निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले होते. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना जामीन अर्ज फेटाळला होता. कोर्टात सुनावणीवेळी सीबीआयने सिसोदियांच्या जामिनाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर कोर्टाने ११ मे रोजी या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.
दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात मनीष सिसोदिया हे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. सिसोदिया हे सुप्रीम कोर्टात जामिनासाठी याचिका दाखल करणार आहेत, अशी माहिती आम आदमी पक्षाने दिली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.