
Manish Sisodia Latest News : मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तुरुंगातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे पत्र लिहिलं आहे. मनीष सिसोदिया यांनी तुरुंगातून लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान मोदींच्या (Pm Narendra Modi) पदवीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सिसोदिया यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, कमी शिकलेले पंतप्रधान देशासाठी अत्यंत धोकादायक आहेत. सिसोदिया यांनी लिहिले की, पंतप्रधान मोदींना विज्ञान समजत नाही, त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळत नाही. गेल्या काही वर्षांत त्यांनी 60,000 शाळा बंद केल्या. भारताच्या प्रगतीसाठी सुशिक्षित पंतप्रधान असणे अत्यंत आवश्यक आहे. (Manish Sisodia Latest News)
सिसोदिया (Manish Sisodia) यांनी लिहिले की, ''आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. जगभरात विज्ञान आणि तंत्रज्ञानात दररोज नवनवीन प्रगती होत आहे. संपूर्ण जग बुद्धिमत्तेबद्दल बोलत आहे. अशा वेळी नाल्यात पाईप टाकून घाणेरड्या गॅसपासून चहा किंवा अन्न बनवता येते, असे पंतप्रधानांचे म्हणणे ऐकून माझे हृदय धडधडते.'' (Latest Marathi News)
त्यांनी लिहिलं की, नाल्यातील घाणेरड्या वायूपासून चहा किंवा अन्न बनवता येते का? नाही. ढगांच्या मागे उडणारे विमान रडार पकडू शकत नाही, असे पंतप्रधान जेव्हा सांगतात, तेव्हा लोक त्यांच्यावर हसतात. शाळा-कॉलेजात शिकणारी मुलं त्याची चेष्टा करतात.
त्यांनी (Manish Sisodia's Letter) पत्रात पुढे लिहिलं की, 'त्यांची अशी विधाने देशासाठी अत्यंत धोकादायक आहेत. भारताचे पंतप्रधान किती कमी शिक्षित आहेत, हे संपूर्ण जगाला कळते आणि त्यांना विज्ञानाचे प्राथमिक ज्ञानही नाही. इतर देशांचे राष्ट्रीय अध्यक्ष जेव्हा पंतप्रधानांना मिठी मारतात तेव्हा प्रत्येक मिठीची मोठी किंमत देऊन ते निघून जातात. त्या बदल्यात किती कागदपत्रांवर सह्या होतात माहीत नाही, कारण पंतप्रधान कमी शिकलेले असल्याने त्यांना समजत नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.