'भगवान और खुदा...', हिंसक घटना घडत असतानाच मनोज वाजपेयीची कविता झाली व्हायरल

manoj bajpayee
manoj bajpayeesaam tv

नवी दिल्ली: काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना (violation incident) घडत आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडियावरही (social media) मोठ्या संख्येनं प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनांमध्ये बॉलीवूड अभिनेता मनोज बाजपेयी (manoj bajpayee) याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओत तो एकतेवर कविता वाचत आहे. ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वाढदिवसानिमित्त मनोजचा खास व्हिडिओ व्हायरल 

आज २३ एप्रिलला मनोज वाजपेयी याचा वाढदिवस आहे आणि योगायोगाने बघा की, यावेळी त्याचा हा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मनोज वाजपेयी वाचत असलेली कविता बॉलिवूड दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी लिहिली आहे. धर्माच्या नावावर दंगली का होतात? जर ईश्वर आणि खुदा बोलले तर ते काय बोलतील आणि त्यांचा दृष्टिकोन काय असेल, त्यावर ही कविता आहे. धर्माच्या नावाखाली काहीही करायला तयार असलेल्या आणि मानवतेचे नुकसान करणाऱ्या सर्वांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ही कविता आहे.

manoj bajpayee
पाकमधून शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना भारतात नोकऱ्या नाहीत; अ‍ॅडव्हायझरी जारी

'भगवान आणि खुदा' असे कवितेचे शीर्षक आहे. २ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये मनोज वाजपेयी म्हणत आहेत- "भगवान आणि खुदा आपापसांत बोलत होते. मंदिर आणि मशिदीच्या पायरीवर भेटत होते. प्रार्थनेत हात जोडले किंवा वर केले तरी काही फरक पडत नाही. कोणी मंत्रोच्चार करतात तर कोणी नमाज पढतात. माणसाला लाज का वाटत नाही, जेव्हा तो बंदूक दाखवून विचारतो की, कोणता तुझा धर्म आहे? त्या बंदुकीतून निघणारी गोळी ना ईद पाहते ना होळी, रस्त्यावर सजलेली निरपराध रक्ताची होळी. भगवान आणि खुदा आपापसात बोलत होते, मंदिर आणि मशिदीच्या पायरीवर भेटत होते.

कवीने आपले विचार मांडले

कवी मिलाप झवेरी यांनीही या व्हिडिओवर आणि देशातील सद्य परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. पीटीआयशी संवाद साधताना ते म्हणाले- मी पाहतोय की, ही कविता पुन्हा आताच्या परिस्थितीशी मिळतीजुळती आहे. कारण दुर्दैवाने गेल्या काही दिवसांत अशा घटना देशभरात पाहायला मिळत आहेत. ही कविता मी २०२० च्या मे महिन्यात प्रकाशित केली होती. त्यावेळी कोरोना सुरू झाला आणि मला या कवितेतून मानवतेबद्दल सकारात्मक संदेश द्यायचा होता.

सामर्थ्यशाली व्हिडिओ

झवेरी पुढे म्हणाले, “हा एक साधा व्हिडिओ आहे आणि सध्याची परिस्थिती सांगत आहे. ही कविता कोणाला दोष देत नाही किंवा कोणावर ताशेरे ओढणारी नाही. एकात्मतेत खूप सामर्थ्य आहे आणि हे जाणून घेतल्यावर आपण एकत्र का राहू शकत नाही, हाच संदेश तो तुम्हाला एका भक्कम ताकदीने देत आहे. या कवितेला आवाज दिल्याबद्दल मनोज वाजपेयी सरांचा मी आभारी आहे. एका महत्त्वाच्या कामात मला साथ दिली. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे''.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com