Facebookवर लफडं: 2 मुलांच्या आईचे प्रियकरासोबत पलायन

पश्चिम बंगालच्या हुगली येथे एक हैराण करणारी धक्कादायक घटना घडली आहे.
Facebookवर लफडं: 2 मुलांच्या आईचे प्रियकरासोबत पलायन
Facebookवर लफडं: 2 मुलांच्या आईचे प्रियकरासोबत पलायनSaam Tv

वृत्तसंस्था: पश्चिम बंगालच्या हुगली येथे एक हैराण करणारी धक्कादायक घटना घडली आहे. येथे अनैतिक संबंधावरून २ मुलांची आई आपल्या प्रियकराबरोबर (boyfriend) पळून गेली आहे. ही घटना हुगलीच्या (Hooghly) रिसडा भागातील असल्याचे सांगितले जात आहे. पीडित पतीने पोलिसामध्ये (police) याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार की, त्याची पत्नी फेसबुकवर (Facebook) मागील काही महिन्यांपासून एका तरूणाबरोबर चॅट करत होती. मग अचानक १४ जानेवारीला ६ वर्षाची मुलगी आणि ११ वर्षाचा मुलगा सोडून ती बेपत्ता झाली आहे.

हे देखील पहा-

ही घटना साधारण ७ दिवसाअगोदर घडली आहे. पण पोलिसांना महिलेचा अजून देखील काहीच पत्ता लागला नाही. पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार की, त्याला पूर्ण विश्वास आहे की, त्याची पत्नी तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली आहे. महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार की १५ वर्षाअगोदर त्याचे लग्न (married) हुगलीच्या कोननगर भागामधील कविताबरोबर झाले होते आणि दोघांमध्ये खूप चांगले संबंध होते. नंतर त्यांना २ मुले झाली. जीवन पूर्णपणे ठीक सुरू होते.

Facebookवर लफडं: 2 मुलांच्या आईचे प्रियकरासोबत पलायन
Mumbai: दीड महिन्यापूर्वी अटक केलेल्या कैद्याची ऑर्थर रोड जेलमध्ये आत्महत्या

काही दिवसांपासून त्याची पत्नी फेसबुकवर फार व्यस्त राहू लागली होती. पण त्याला जरा देखील या गोष्टीचा संशय आला नाही की, त्याची पत्नी २ मुलांना सोडून अशी पळून जाणार आहे. पीडित व्यक्तीने पोलिसांना (police) विनंती केली आहे की, लवकरात लवकर त्याच्या पत्नीला शोधून आणा. कारण आई अशी अचानक सोडून गेल्यामुळे ६ वर्षाची मुलगी रडून रडून बेहाल झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, लवकरच महिलेला शोधले जाईल. सर्विलांसची मदत घेतली जात आहे आणि तिच्या फेसबुक अकाउंटवर (account) देखील करडी नजर ठेवली जात आहे. जेणेकरून काही पुरावा मिळावा. महिलेला पकडले जाणार आहे. सध्या परिसरात या घटनेची सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com