Health News: पुन्हा मास्क घालावा लागणार? मात्र यावेळी कारण कोरोना व्हायरस नाही

देशात आतापर्यंत H3N2 इन्फ्लूएंझामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
 Mask
MaskSaam TV

H3N2 Virus : कोरोनानंतर आता पुन्हा एकदा मास्क घालावा लागू शकतो. यावेळी कारण आहे H3N2 इन्फ्लूएंझा व्हायरस, ज्याचा झपाट्याने प्रसार होताना दिसत आहे. देशात आतापर्यंत H3N2 इन्फ्लूएंझामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही रुग्ण कर्नाटक आणि हरियाणातील आहेत. या विषाणूचे आतापर्यंत 90 रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे.  (Latest Marathi News)

H3N2 मुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान, नीती आयोगाने H3N2 संदर्भात बैठकही घेतली आणि आता केंद्र सरकारकडून पत्र लिहून राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. H3N2 चा जास्त धोका कोणाला आहे? H3N2 पासून गंभीर स्थिती कोणाला होऊ शकते? H3N2 ची लक्षणे दिसल्यानंतर कोणाला रुग्णालयात दाखल करावे लागेल? हे सांगण्यात आले आहे. देशभरात इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि श्वसनाचे गंभीर आजार वाढत असल्याचा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

 Mask
Satish Kaushik Death: 'माझ्या नवऱ्याने 15 कोटींसाठी केली सतीश कौशिक यांची हत्या', महिलेची पोलिसांत तक्रार

H3N2 पासून कोणत्या व्यक्तीने अधिक काळजी घ्यावी?

लहान मुलं (५ वर्षांखालील) तसेच गर्भवती महिला, वृद्ध नागरिक यांना या विषाणूची पटकन लागण होते. त्यामुळे या व्यक्तींनी स्वत:ची विशेष काळजी घेणे गरजेचं आहे. सध्या अनेक व्यक्तींना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसत आहेत. यातील बहुतेक व्यक्ती कोमट पाणी पिऊन देखील ठिक होत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्यास या आजाराचा जास्त त्रास होणार नाही. मात्र तसे नसेल तर इन्फ्लूएंझाने जीव जाण्याची देखील शक्यता आहे.

H3N2 ची लक्षणे काय आहेत?

ताप, सर्दी, खोकला, छातीत दुखणे, सांधेदुखी, थकवा, घसा वारंवार खवखवणे अशी लक्षणे जाणवतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com