Gujarat Fire : केमिकल कंपनीला भीषण आग; संपूर्ण मालमत्ता जळून खाक, गुजरातमधील मोठी दुर्घटना

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Gujarat Fire
Gujarat FireANI

Gujarat Fire : गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. काल शनिवारी रात्री येथील एका कंपनीला मोठी आग लागली. यामध्ये कंपनीमधील संपूर्ण सामानाचे नुकसान झाले आहे. सर्व वस्तू जळून खाक झाल्यात. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. (Latest Vadodara Fire News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गुजरातमधील वडोदरा येथे एक केमिकल फॅक्ट्री आहे. काल रात्री अचानक या कंपनीतील एका मशीनमध्ये स्फोट झाल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे आग सर्वत्र पसरली. रात्रीची वेळ असल्याने कंपनीत कामगार नव्हते. त्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Gujarat Fire
Kalyan Fire News: कल्याणमध्ये उंच इमारतीला भीषण आग, 14व्या मजल्यावरील फ्लॅट आगीच्या भक्ष्यस्थानी

गुजरातमध्ये आग लागण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. महिन्याभरापूर्वीच सुरतमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. एका कार शोरुमला भीषण आग लागली होती. अचानक आग लागल्याने येथील अनेक महागड्या गाड्यांच यात नुकसान झालं. या घटनेची माहिती मिळताच आग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बराच वेळ प्रयत्न केल्यावर आग आटोक्यात अणण्यात यश आले.

Gujarat Fire
Fire At Car Garage : अंबरनाथमध्ये कारच्या गॅरेजला भीषण आग; ८ ते १० गाड्या आगीच्या भक्षस्थानी

गुजरातमध्ये काल रात्री कंपनीला लागलेली आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप समजले नाही. मात्र कंपनी मालकाचं यात लाखोंच नुकसान झालं आहे. कंपनीत आग लागून बराच वेळ झाल्यानंतर याची माहिती मिळाली. मात्र तो पर्यंत मोठं नुकसान झालं. तसेच आग पसरत गेली. आग इतकी भीषण होती की आगीचे लोट हवेत दूरवर पसरले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com