यंदाची थंडी हाडं गोठवणारी; हवामान खात्याचा इशारा

दिल्लीसह देशातील किमान तापमानाचा पारा 3 अंश सेल्सिअस किंवा त्याहूनही कमी असू शकतो.
यंदाची थंडी हाडं गोठवणारी ; हवामान खात्याचा इशारा
यंदाची थंडी हाडं गोठवणारी ; हवामान खात्याचा इशाराSaam Tv

नवी दिल्ली - देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी माहिती ब्लूमबर्ग कडून देण्यात आली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये थंडीचा सर्वाधिक कहर असेल, असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

बर्फाचे प्रमाण आर्क्टिक समुद्रात घटल्यामुळे वायव्य आशियात थंडी पडू शकते. गेल्या वर्षी देखील अशीच स्थिती उद्भवली होती असून यंदाही जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान देशात हाडं गोठावणारी थंडी पडू शकते, असा अंदाज ब्लूमबर्गकडून वर्तवण्यात आला आहे.दरम्यान, संबंधित जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दिल्लीसह देशातील किमान तापमानाचा पारा 3 अंश सेल्सिअस किंवा त्याहूनही कमी असू शकतो.

यंदाची थंडी हाडं गोठवणारी ; हवामान खात्याचा इशारा
Big Breaking : आर्यन खानचा आजचा मुक्काम जेलमध्ये; उद्या सुनावणी

दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली असल्याचे पहायला मिळत आहे. पहाटेच्या सुमारास वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. असे असले तरी मात्र, पुणेकरांना आणखी काही दिवस थंडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुण्यात 31.6 अंश सेल्सिअस कमाल आणि 16.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com