Abdul Sattar : कांदा प्रश्नावरून मंत्री अब्दुल सत्तारांनी मागितली शेतकऱ्यांची माफी; म्हणाले, 'येत्या १० दिवसात...'

कांदा प्रश्नावरून शेतकऱ्यांची कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली आहे.
Abdul Sattar
Abdul Sattar Saam TV

नवी दिल्ली : सध्या कांदा आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी मालाला भाव मिळत नसताना मेटाकुटीला आहे. यावर येत्या १० दिवसात तोडगा काढला जाईल. ज्या शेतकऱ्यांना या कठीण परिस्थिती त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्या शेतकऱ्यांची कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी माफी मागतो. येत्या १० दिवसात सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सभागृहात घोषणा करेल, असेही सत्तार यांनी सांगितले. (Latest Marathi News)

कांद्याला (Onion) भाव मिळत नसल्याने बळीराजा त्रस्त झाला आहे. राज्यात काही शेतकऱ्यांना ५०० हून अधिक कांदा विकून देखील पदरी १ ते २ रुपये मिळत आहे. त्यामुळे कांद्याला योग्य असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. राज्यातील काही भागात कांद्याला भाव मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात आंदोलन केली जात आहे. याच दरम्यान, या परिस्थितीवर शिंदे सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी भाष्य केलं.

Abdul Sattar
Hasan Mushrif News : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ; घरावर ईडीकडून पुन्हा धाड

अब्दुल सत्तार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सत्तार म्हणाले, 'राज्यात केंद्रीय कृषी विद्यापीठ व्हावं, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली. नाफेडची ४० केंद्र सुरु आहेत. कांद्याला नाफेडच्या दराप्रमाणे भाव मिळत आहे. युक्रेन-रशियाच्या युद्धामुळं होत आहे. महाराष्ट्र सरकार कांद्याला किती अनुदान द्यायचं याचा विचार करत आहे'.

Abdul Sattar
Political News :...तर तुमच्या सत्तेचे पीक उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही; ठाकरे गटाचा 'सामना'तून हल्लाबोल

'अधिवेशन संपण्याच्या अगोदर याबाबतीत तोडगा काढला जाईल. खत विक्री करत असताना जातीचा उल्लेख केला आहे, या संदर्भात केंद्रीय कृषीमंत्र्यांशी बोललो आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला नाही, तर मला वाईट वाटतं. मी शेतकऱ्यांची माफी मागतो. येत्या १० दिवसांत तोडगा निघेल, असा विश्वास कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com