जिग्नेश मेवाणींसह रेश्मा पटेलला तीन महिन्यांचा तुरुंगवास; एक हजार रुपयांचा दंड

MLA Jignesh Mevani And Reshma Patel News : यासोबतच कोर्टाकडून त्यांना एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
जिग्नेश मेवाणींसह रेश्मा पटेलला तीन महिन्यांचा तुरुंगवास; एक हजार रुपयांचा दंड
MLA jignesh mevani and reshma patel three months imprisonment mehsana courtSaam TV

गांधीनगर, गुजरात: विनापरवानगी रॅली काढल्याप्रकरणी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांना महेसाणा (Gujrat) कोर्टातून मोठा झटका बसला आहे. मेवाणी यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच एक हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. जिग्नेश मेवाणी (MLA jignesh mevani) यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्या रेश्मा पटेल (Reshma Patel NCP) आणि सुबोध परमार (Subodh Parmar) यांनाही तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एकूण १२ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. (MLA jignesh mevani and reshma patel three months imprisonment mehsana court)

हे देखील पाहा -

२०१७ मध्ये त्यांनी स्वातंत्र्य पदयात्रा काढली. ही रॅली विनापरवाना केल्याचा आरोप करण्यात आला. आता महेसाणा न्यायालयाने त्यांना याच प्रकरणात दोषी ठरवले आहे. आमदार जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीच्या नेत्या रेश्मा पटेल, सुबोध परमार यांच्यावर रॅली काढून सरकारी अधिसूचनेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.