बृजभूषण यांना आवरा, अन्यथा...; साध्वी कांचनगिरी यांचं मोदींना पत्र

बृजभूषण यांनी केलेल्या विरोधानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे
sadhvi kanchangiri letter to pm modi
sadhvi kanchangiri letter to pm modiSaam Tv

नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर (MNS Ayodhya Tour) जाणार आहे. राज यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, दुसरीकडे राज यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह (MP Brijbhushan Singh) यांनी विरोध दर्शवला आहे. "आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, तरच अयोध्येत पाय ठेवा" अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. बृजभूषण यांनी केलेल्या विरोधानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. अशातच बृजभूषण यांना आवर घालण्यासाठी साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

sadhvi kanchangiri letter to pm modi
रतन टाटांनी पुन्हा हृदय जिंकलं; 'नॅनो'मधून आले ताज हॉटेलात, ना सिक्युरिटी गार्ड ना कसला थाट!

"ब्रृजभूषण यांना आवरा, राज ठाकरेंना अयोध्याला येऊ द्या" अशी मागणी साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे. राज यांच्या दौऱ्याला उत्तर भारतीयांकडून विरोध होत आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. "उत्तर भारतीयांचे वंशज भगवान श्रीरामाचा महाराष्ट्रात अपमान झाला आहे. राज ठाकरे अपराधी आहेत", असे खासदार बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी. माफी मागितल्याशिवाय अयोद्धेत आले तर राज ठाकरे यांचा आम्ही उत्तर भारतीय विरोध करणार, असा देखील इशारा सुद्धा खासदार बृजभूषण सिंह यांनी दिला आहे.

विशेष म्हणजे राज यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत भाजपच्या नेत्यामध्ये मतभेद असल्याचे दिसून आले आहे. बृजभूषण यांच्या विरोधानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. मनसे नेत्यांनीही बृजभूषण यांना आव्हान दिले होते. मात्र अशातच बृजभूषण यांना आवर घालण्यासाठी साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

sadhvi kanchangiri letter to pm modi
sadhvi kanchangiri letter to pm modikanchangiri

कोण आहेत कांचनगिरी?

साध्वी कांचनगिरी या जुना आखाड्याशी संबंधित आहेत. त्या महिला संत म्हणून प्रसिद्ध आहेत. कांचनगिरी यांचा जन्म झारखंड राज्यातील हजारी वाघ या ठिकाणी झाला. सध्या त्या दिल्लीच्या सेक्टर-5 मधील वैशाली येथे राहतात. त्यांनी मधल्या काळात देश बचाओ आंदोलन सुरू केलं होतं. मागील 25 वर्षांपासून त्या सामाजिक कार्य करत आहेत. देशात हिंदू धर्माचा प्रसार करण्यासह युरोपीय देशात देखील कांचनगिरी यांनी हिंदू धर्माचा प्रसार केला आहे. गंगा यमुना या नद्यांमध्ये निर्माल्य टाकलं जातं ते साफ-सफाई करण्याची मोहीम कांचनगिरी यांनी हाती घेतली होती. तसेच देशातील इतर मुख्य नद्या सफाई करण्याचे ध्येय हाती घेतले होते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com