
Rahul Gandhi Serious Allegations On BJP: राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू असलेली कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा आज, २४ डिसेंबरला दिल्लीत दाखल झाली आहे. यावेळी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. "माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपने कोट्यवधी रुपये खर्च केले" असा गंभीर आरोप राहुल गांधींनी भाजपवर केला आहे. तसेच देशात भय पसरवण्यासाठी भाजपवाले २४ तास बोलतात असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. (Bharat Jodo Yatra enters Delhi)
राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, माझी प्रतिमा खराब करण्यासाठी पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि भाजपने हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. पण मी एक शब्द बोललो नाही आणि स्पष्टीकरणही दिलं नाही, मी अगदी गप्प राहीलो. मला वाटलं बघू किती मजबूत आहे हे लोक, माझ्याविरोधात व्हॉट्सअॅप, फेसबुकवर खेळले. देशभर दुष्प्रचार केला आता एका महिन्यात मी सत्य दाखवलं आणि सगळंचं संपवलं. सत्य लपवता येत नाही. कुठेतरी सत्य बाहेर येतं.
द्वेष आणि भीतीने आपल्या देशाचे नुकसान होत आहे. हे सत्य आहे. म्हणूनच आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही भारत जोडो यात्रा करत आहोत. आम्ही आता श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवू असं राहुल गांधी म्हणालेत. तसेच ते पुढे ते म्हणाले, भाजपवाले हिंदू धर्माबद्दल बोलतात. मला विचारायचे आहे- हिंदू धर्मात कुठे लिहिले आहे- गरीब आणि दुर्बल लोकांना मारले पाहिजे. हिंदू धर्म म्हणतो, घाबरू नका आणि हे लोक देशभरात २४ तास भीती पसरवण्याविषयी बोलतात असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे. (Latest Marathi News)
राहुल गांधी म्हणाले की, पत्रकारांनी मला विचारले की तुम्हाला थंडी वाजत नाही. मी म्हणालो तुम्ही हे भारतातील शेतकरी, मजूर आणि गरिबांना का विचारत नाहीत. मी २८०० किमी अंतर कापले आहे. ही काही मोठी गोष्ट नाही. याने फार चांगले काम केले नाही. संपूर्ण भारत धावतो. शेतकरी, मजूर त्यांच्या संपूर्ण आयुष्यात 10 हजार किमी चालतात असं ते म्हणाले.
दरम्यान राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे दिल्लीत मेगा शोमध्ये रूपांतर झाले आहे. येथे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधींच्या बहीण प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांनीही यात्रेत सहभाग घेतला होता. राहुल यांच्या दौऱ्याला येथील सर्वसामान्यांचाही पाठिंबा मिळत आहे. राहुल यांनी सकाळी राम दरबारत दर्शन घेतलं आणि दुपारी हजरत निजामुद्दीन यांच्या दर्ग्यात जाऊन नमाज अदा केली. राहुल यांचं शक्तिप्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मथुरा रोड, इंडिया गेट आणि आयटीओ मार्गे ही यात्रा लाल किल्ल्यावर पोहोचली आहे. राहुल यांनी विरोधी पक्षांनाही भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.
राहुल गांधींच्या पदयात्रेला सायंकाळी गर्दी वाढल्याने अधिक वेळ लागत असून उशीर झाला. आता राहुल गांधी उद्या म्हणजेच 25 डिसेंबरला सकाळी महापुरुषांच्या समाधी स्थळावर श्रद्धांजली वाहण्यासाठी जाणार आहेत. राहुल उद्या वीरभूमी (राजीव गांधी), शक्तीस्थळ (इंदिरा गांधी), शांती वन (पं. जवाहरलाल नेहरू), विजय घाट (लाल बहादूर शास्त्री), राष्ट्रीय स्मृती स्थळ (अटलबिहारी वाजपेयी), राजघाट (महात्मा गांधी) येथे महापुरुषांनी श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.