Modi Govt 9th Anniversary: मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण, भाजप राबवणार 'हा' मास्टर प्लॅन

मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण, भाजप राबवणार 'हा' मास्टर प्लॅन
Modi Govt 9th Anniversary
Modi Govt 9th AnniversarySaam Tv

Modi Govt 9th Anniversary: केंद्रातील मोदी सरकारला २६ मे रोजी ९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भाजपने महिनाभरापासून देशभर जनसंपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने ३० मे ते ३० जून या कालावधीत देशभरात सुमारे ५० रॅली काढण्याची योजना आखली आहे. या सभांमध्ये पंतप्रधान मोदी आणि अनेक भापचे बडे नेते सभांना संबोधित करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला करणारा सुरुवात

सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार, या सभांमुळे भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीलाही चालना मिळणार आहे. ३१ मे रोजी राजस्थानमधील अजमेर येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  (Latest Marathi News)

Modi Govt 9th Anniversary
Parliament Building Inauguration: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार, 19 विरोधी पक्षांनी दर्शवला विरोध

नड्डा, शाह आणि राजनाथ सिंह हेही जनसंपर्क अभियानात सहभागी होणार

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ यांच्या सोबतच इतर केंद्रीय मंत्री आणि नेतेही या जनसंपर्क अभियानाचा भाग असणार आहेत. दरम्यान, २७ मे रोजी जेपी नड्डा पत्रकार परिषदेत मोदी सरकारने आतापर्यंत केलेल्या विकासकामांबद्दल सांगणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जनसंपर्क अभियानादरम्यान देशभरात ४५ ते ५५ मोठ्या रॅली काढण्यात येणार आहेत.

केंद्राच्या कामांच्या प्रचारासाठी मास्टर प्लॅन

सूत्रांनी सांगितले की, मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपने केंद्राच्या कामांची प्रसिद्धी करण्यासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. ज्याची सुरुवात ३१ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या रॅलीने होणार आहे.

३० मे ते ३० जून या कालावधीत चालणाऱ्या या विशेष मोहिमेत पक्षातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदींनी २६ मे २०१४ रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यानंतर ३० मे २०१९ रोजी पंतप्रधान मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com