Most Powerful PM: नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते; लोकसभा निवडणुकांबाबत मोठी भविष्यवाणी, रिपोर्टमध्ये दडलंय काय?

Most Powerful PM Report By British Newspaper The Economist: गेल्या 9 वर्षांत भारतीय जनता पक्षाने 2 लोकसभा निवडणुका आणि डझनभर राज्यांच्या निवडणुका जिंकल्या आहेत.
Narendra Modi
Narendra ModiSAAM TV

Most Powerful Prime Minister In The World: ब्रिटनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द इकॉनॉमिस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं वर्णन जगातील सर्वात लोकप्रिय नेते असे केले आहे. जियो-पॉलिटिक्स पत्रकारितेसाठी प्रसिद्ध असलेल्या द इकॉनॉमिस्टने आपल्या एका रिपोर्टमध्ये भारताचे राजकारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्याभोवती फिरत असल्याचे म्हटले आहे.

द इकॉनॉमिस्टने एका रिपोर्टमध्ये स्वत:ला भारतीय जनता पक्षाचे समर्थक न मानणाऱ्या गणेश कनोजिया नावाच्या व्यक्तींच उदाहरण दिले आहे. या रिपोर्टनुसार ऑटो-रिक्षा चालक असलेले 58 वर्षीय गणेश कनोजिया हे काँग्रेसचे मतदार आहेत. परंतु दलित समाजातून आलेल्या गणेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला मत देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

द इकॉनॉमिस्टने म्हटले की, नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर जागतिक राजकारणात प्रवेश करणं आणि आपली एक छाप सोडणं हा एक मोठा विकास आहे. गेल्या 9 वर्षांत भारतीय जनता पक्षाने 2 लोकसभा निवडणुका आणि डझनभर राज्यांच्या निवडणुका जिंकल्या आहेत. परंतु राज्यांच्या राजकारणावर नियंत्रण ठेवण्यात भाजप पूर्णपणे अपयशी ठरला आहे.

या रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, निम्म्याहून अधिक राज्यात भाजपचे सरकार नाही. पण लोकसभा निवडणुका आल्या की सारंच बदलून जातं. असे चित्र आहे की पुढील पाच वर्षांसाठीच नाही तर कदाचित त्यानंतरदेखील नरेंद्र मोदींचे नाव जनतेच्या मनात आहे. त्याचं अप्रुव्हल रेटिंग 77 टक्क्यांहून अधिक आहे. त्याच्या पक्षाच्या दुप्पट जनतेत त्यांची मान्यता आहे. यामुळे ते जगातील सर्वात लोकप्रिय निवडून आलेले नेते ठरले आहेत.

Narendra Modi
Chhatrapati Sambhajinagar News: राज्यात मोठं षडयंत्र सुरु आहे, अजित पवारांना अशी शंका का येतेय?

द इकॉनॉमिस्टच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचंड लोकप्रियतेची तीन मुख्य कारणे आहेत एक त्यांचं नशीब अतिशय जोरावर आहे, दुसरं म्हणजे त्यांचं राजकारण आश्चर्यकारक आहे आणि तिसरं म्हणजे राजकारण कठोर आहे. द इकॉनॉमिस्टने लिहिले आहे की अशा अनेक घटना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर घडतात, ज्यामुळे मोदींसाठी चांगले वातावरण तयार होते आणि त्यांची शक्ती वाढते.

मात्र वास्तवात मोदी सरकारने आर्थिक आघाडीवर आपल्या आधीच्या काँग्रेस सरकारपेक्षा चांगली कामगिरी केल्याचा दावा खोटा आहे, तरीही गांधी घराण्याच्या चौथे वंशज असलेले राहुल गांधींचं नेतृत्व आणि काँग्रेस अपयशी ठरली आहे. ब्रिटीश वृत्तपत्राने लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रिय आश्वासने लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पुरेशी आहेत, राहुल गांधींना त्यांचा सामना करणे कठीण दिसत आहे.

ब्रिटीश वृत्तपत्राने लिहिले आहे की, एकीकडे राहुल गांधी हे त्यांच्या आजोबांसारखे आहेत आणि वडिलांप्रमाणे ऑक्सब्रिजमधून वाढलेले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म गरिबीत झाला आणि ते जे काही शिकले ते त्यांच्या जीवनातून शिकले. मोदींची विचारसरणी भारतातील कोट्यवधी लोकांच्या विचारसरणीशी जुळते म्हणून त्यांचं खूप कौतुक होत आहे.

द इकॉनॉमिस्टने लिहिले की आणखी एक केंब्रिज-शिक्षित काँग्रेसचे दिग्गज नेते (मणिशंकर अय्यर) यांनी एकदा पंतप्रधान मोदींना चायवाला म्हणून संबोधले होते. जे ते होते, परंतु त्यांच्या या टिकेचा इतका विनाशकारी वापर कोणत्याही राजकीय नेत्याने यापूर्वी केला नसेल. या टिकेच्या एकदम उलट परिणाम झाला पाहायला मिळाला. (Breaking News)

Narendra Modi
Shivneri Hapus: जुन्नर हापूसला लवकरच 'शिवनेरी हापूस' ओळख मिळणार, अमोल कोल्हे यांचं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच्याकडे राजकीय नेरेटिव्ह टिपण्याची जबरदस्त प्रतिभा आहे, ते सार्वजनिक भावना समजून घेण्यात तरबेज आहेत की ते याला एक अथक प्रचारक म्हणून इंदिरा गांधींपासून किंवा तेव्हापासूनच्या इतर कोणत्याही भारतीय नेत्यापेक्षा अधिक महत्त्व देतात. तसेच इंदिरा गांधींप्रमाणे मोदी देखील त्यांच्या सरकारने जे काही साध्य केले त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यातील बरेच काही साध्य झालेले नसते. संपूर्ण भारतभर होर्डिंग्जवर लावलेली त्यांच्या हसतमुख छायाचित्रांमुळे मोदी सर्व काही करतील असा विश्वास लोकांच्या मनात रुजवण्यात ते यशस्वी होतात. (Latest Political News)

द इकॉनॉमिस्टच्या रिपोर्टनुसार राजदीप घोष या कोलकाता येथे राहणारे 34 वर्षीय आयटी प्रोफेशनल म्हणतात की "गोष्टी कशा अंमलात आणायच्या हे फक्त मोदींनाच माहीत आहे." तर दिल्लीतील 55 वर्षीय ड्रायव्हर नरेंद्र यादव म्हणतात की "मोदी जी गरिबांना खूप घरे देत आहेत आणि मोदीजींनी महामारीच्या काळात अनेकांचे प्राण वाचवले आहेत."

निवडणूक विश्लेषक संजय कुमार यांचा हवाला देत द इकॉनॉमिस्टने लिहिले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींची २० टक्के लोकप्रियता त्यांच्या राजकीय विरोधकांच्या तटस्थतेमुळे आणि ६५ टक्के त्यांच्या राजकीय कौशल्यामुळे आहे. त्यांनी केवळ 15 टक्के लोकप्रियतेसाठी पंतप्रधान मोदींचे कठोर राजकारण जबाबदार मानले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com