मोदींनी केले आठ मंत्र्यांचे प्रमोशन; ३३ नव्यांना दिली संधी

मंत्रिमंडळात 33 नवीन चेहऱ्यांचा समावेश
मोदींनी केले आठ मंत्र्यांचे प्रमोशन; ३३ नव्यांना दिली संधी
मोदींनी केले आठ मंत्र्यांचे प्रमोशन; ३३ नव्यांना दिली संधीSaam Tv

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात 43 नेत्यांनी शपथ घेतली आहे. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या 43 नेत्यांची अंतिम यादी जाहिर झाली होती. मंत्रिमंडळाचा विस्तार पाहता 10 मंत्र्यांचे प्रमोशन करण्यात आले आहे. तर मंत्रिमंडळात 33 नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Modi promotes eight ministers; Opportunity given to 33 newcomers

केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारमंत्रीपद अमित शाह Amit Shah यांच्याकडे देण्यात आले असून त्यांच्याकडील केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. डॉ. हर्षवर्धन यांच्याकडील आरोग्य खाते मनसुख मंडाविय यांना देण्यात आले आहे. काही बड्या मंत्र्यांचा खातेबदल करत, मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या युवा नेत्यांना महत्त्वाची खाती देण्यात आली आहे.

हे देखील पहा -

मोदी मंत्रिमंडळ पूर्वीच्या तुलनेत यावेळी अधिक तरुण असून महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, जाट, मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेशला सर्वाधिक ७ तर, महाराष्ट्राला ४ मंत्रिपदे देण्यात आली आहेत. तर केंद्रीय मंत्रिमंडळात २५ राज्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे.

तर महाराष्ट्रातून संजय धोत्रे आणि प्रकाश जावडेकर यांची हकालपट्टी केली आहे. बुधवारी झालेल्या विस्तारात मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील ४ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. Modi promotes eight ministers; Opportunity given to 33 newcomers

मोदींनी केले आठ मंत्र्यांचे प्रमोशन; ३३ नव्यांना दिली संधी
महाराष्ट्राला 8 मंत्रिपदं; वाचा कुणाकडे कोणती जबाबदारी?

कुणाला मिळाली कोणती जबाबदारी?

१) नरेंद्र मोदी - पंतप्रधान, कार्मिक, निवृत्तिवेतन, ग्राहक कल्याण, अणुऊर्जा, अवकाश संशोधन, महत्त्वाच्या धोरणात्मक बाबी आणि इतर मंत्र्यांकडे न दिलेली खाती

२) राजनाथसिंह- संरक्षण

३) अमित शहा - गृह आणि सहकार

४) नितीन गडकरी- रस्ते वाहतूक आणि महामार्ग

५) निर्मला सीतारामन- अर्थ, कॉर्पोरेट व्यवहार

६) नरेंद्रसिंह तोमर- कृषी आणि शेतकरी कल्याण

७) डॉ.एस.जयशंकर- परराष्ट्र व्यवहार

८) अर्जुन मुंडा- आदिवासी विकास

९) स्मृती इराणी- महिला आणि बालकल्याण

१०) पियुष गोयल- वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक कल्याण, अन्न व पुरवठा आणि वस्त्रोद्योग

११) धर्मेंद्र प्रधान- शिक्षण, कौशल्यविकास, उद्योजकता विकास

१२) प्रल्हाद जोशी- संसदीय कामकाज आणि खाणी

१३) नारायण राणे- सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग

१४) सर्वानंद सोनोवाल- बंदरे, जहाजबांधणी आणि आयुष

१५) मुख्तार अब्बास नक्वी- अल्पसंख्याक

१६) डॉ.वीरेंद्रकुमार- सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण

१७) गिरीराजसिंह- ग्रामीण विकास आणि पंचायत राज

१८) ज्योतिरादित्य शिंदे- नागरी हवाई वाहतूक

१९) रामचंद्रप्रसाद सिंह- पोलाद

२०) अश्‍विनी वैष्णव- रेल्वे, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान

२१) पशुपतीकुमार पारस- अन्नप्रक्रिया उद्योग

२२) गजेंद्रसिंह शेखावत- जलशक्ती

२३) किरेन रिजिजू- कायदा व न्याय

२४) राजकुमारसिंह- ऊर्जा आणि नव व अपारंपरिक ऊर्जा

२५) हरदीपसिंग पुरी- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, गृहनिर्माण आणि शहरी विकास

२६) मनसुख मंडाविया- आरोग्य, कुटुंबकल्याण आणि रसायने व खते

२७) भूपेंद्र यादव- पर्यावरण, वने आणि हवामान बदल, कामगार आणि रोजगार

२८) डॉ. महेंद्रनाथ पांडे- अवजड उद्योग

२९) पुरुषोत्तम रुपाला- मत्स्योद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन

३०) जी.किशन रेड्डी- सांस्कृतिक, पर्यटन, ईशान्य भारत विकास

३१) अनुराग ठाकूर- माहिती आणि नभोवाणी, युवक कल्याण आणि क्रीडा

राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)

१) राव इंद्रजितसिंह- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी, नियोजन, कॉर्पोरेट व्यवहार

२) जितेंद्रसिंह- विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, ग्राहक कल्याण आणि निवृत्तिवेतन, अणुऊर्जा, अवकाश संशोधन

राज्यमंत्री

१) श्रीपाद नाईक- बंदरे, जहाजबांधणी, जलमार्ग आणि पर्यटन

२) फग्गनसिंह कुलस्ते- पोलाद, ग्रामीण विकास

३) प्रल्हादसिंह पटेल- जलशक्ती, अन्नप्रक्रिया उद्योग

४) अश्‍विनीकुमार चौबे- ग्राहककल्याण, अन्न आणि सार्वजनिक वितरण, पर्यावरण, वने आणि हवामान बदल

५) अर्जुनराम मेघवाल- संसदीय कामकाज, सांस्कृतिक

६) जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंह- रस्ते वाहतूक, महामार्ग, नागरी हवाई वाहतूक

७) क्रिशनपाल- ऊर्जा, अवजड उद्योग

८) रावसाहेब दानवे- रेल्वे, कोळसा आणि खाणी

९) रामदास आठवले - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण

१०) साध्वी निरंजन ज्योती- ग्राहक कल्याण, अन्न आणि सार्वजनिक वितरण, ग्रामीण विकास

११) संजीवकुमार बलियान- मत्स्योद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन

१२) नित्यानंद राय- गृह

१३) पंकज चौधरी- अर्थ

१४) अनुप्रिया पटेल- वाणिज्य आणि उद्योग

१५) एस.पी.सिंह बघेल- कायदा व न्याय

१६) राजीव चंद्रशेखर- कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान

१७) शोभा करंदलजे- कृषी आणि शेतकरी कल्याण

१८) भानूप्रतापसिंह वर्मा- सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग

१९) दर्शना जर्दोष - वस्त्रोद्योग, रेल्वे

२०) व्ही. मुरलीधरन - परराष्ट्र व्यवहार, संसदीय कामकाज

२१) मीनाक्षी लेखी - परराष्ट्र व्यवहार, संस्कृती

२२) सोम प्रकाश - वाणिज्य आणि उद्योग

२३) रेणुकासिंह सरुता - आदिवासी कल्याण

२४) रामेश्वर तेली - पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, श्रम, रोजगार

२५) कैलास चौधरी - कृषी, शेतकरी कल्याण

२६) अन्नपूर्णा देवी - शिक्षण

२७) ए. नारायणस्वामी- सामाजिक न्याय आणि सबलीकरण

२८) कौशल किशोर - गृहनिर्माण आणि नगर विकास

२९) अजय भट - संरक्षण, पर्यटन

३०) बी. एल. वर्मा - ईशान्य भाग विकास, सहकार

३१) अजय कुमार - गृह

३२) देवूसिंह चौहान - दळणवळण

३३) भगवंत खुबा - नव आणि अपारंपरिक ऊर्जा, रसायने-खत

३४) कपिल पाटील - पंचायत राज

३५) प्रतिमा भौमिक - सामाजिक न्याय आणि सबलीकरण

३६) सुभाष सरकार - शिक्षण

३७ ) डॉ. भागवत कराड - अर्थ

३८) डॉ. राजकुमार रंजनसिंह - परराष्ट्र व्यवहार, शिक्षण

३९) भारती पवार - आरोग्य आणि कुटुंब कल्याण

४०) बिश्वेषर टुडू - आदिवासी कल्याण, जलशक्ती

४१) शंतनू ठाकूर - बंदर, जहाजबांधणी, जलमार्ग

४२) डॉ. मुंजापारा महेंद्रभाई - महिला, बाल कल्याण, आयुष

४३) जॉन बार्ला - अल्पसंख्याक कल्याण

४४) डॉ. एल. मुरुगन - मत्सोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, माहिती-नभोवाणी

४५) नितीश प्रामाणिक - गृह, युवक कल्याण-क्रीडा

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com