Modi Statue | भंगाराचा वापर करुन साकारला मोदींचा १४ फुटांचा पुतळा
Modi Statue | भंगाराचा वापर करुन साकारला मोदींचा १४ फुटांचा पुतळाSaam Tv News

Modi Statue | भंगाराचा वापर करुन साकारला मोदींचा १४ फुटांचा पुतळा

बंगळूरातल्या एका कलाकारानं चक्क भंगाराचा वापर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुर्णाकृती पुतळा उभारला आहे. तेही सुमारे १४ फुट उंचीचा...

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता तर आपल्याला माहितच आहे. नरेंद्र मोदींच्या प्रेमाखातर त्यांचे भक्त अनेकदा अनाकलनीय गोष्टी करत असतात. तुम्ही मोदींचा मेणाचा पुतळा बनवल्याचं एकलं असेल किंवा अगदी मागच्या महिन्यातली गोष्ट आहे, पुळ्यातल्या एका भाजप कार्यकर्त्याने चक्क मोदींच मंदिरच बांधलं होत. मात्र ही घटना ताजी असतानाच आणखी एक आगळी-वेगळी बातमी समोर आली आहे. बंगळूरातल्या एका कलाकारानं चक्क भंगाराचा वापर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुर्णाकृती पुतळा उभारला आहे. तेही सुमारे १४ फुट उंचीचा... (Modi Statue | A 14-feet statue of Modi was made using scrap metal)

हे देखील पहा -

बंगळूरातील कलाकार कतुरु व्यकटेश्वर राव आणि त्यांचा मुलगा कतुरु रवी यांनी दोन महिन्यांपुर्वी हा पुतळा बनवला असून आता हा पुतळा शहरात उभारण्यात येणार आहे. भाजप नगरसेवक यांनी हा पुतळा उभारण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांनी टाकुन दिलेले साहित्य आणि भंगाराचा वापर करुन हा १४ फुटी पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याचं वजन सुमारे एक टनपेक्षा जास्त आहे. सुरवातीला हा पुतळा बनवण्यासाठी नट-बोल्ट्सचा वापर करण्यात आला होता. नंतर टायर्स, मेटल चैन, रॉड, शिट्, पत्रे यांचा वापर करुन हा पुतळा साकारला गेला आहे.

Modi Statue | भंगाराचा वापर करुन साकारला मोदींचा १४ फुटांचा पुतळा
मोदींनी पाठवलेल्या पत्राने अक्षय कुमार भावुक, म्हणाला ''हे शब्द नेहमी...''

हा पुतळा साकारण्यासाठी ६०० तासंपेक्षा जास्त कालावधी लागला तसेच १० जणांनी मिळून हे वेल्डींगचे काम पुर्ण केले. तर पुतळ्याची दाढी, चष्मा, केस इत्यादींसाठी जीआय वायरीचा सुबकपणे वापर केला गेला आहे. हा पुतळा बनवण्यासाठी हैद्राबाद, विशाखापट्टणम, चेन्नई आणि गुंटुर येथील भंगार विक्रेत्यांकडुन भंगार गोळा करुन हा भव्य पुतळा साकारण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com