शाळेचा यूनिफॉर्म आणि बॅग घेऊन माकडाची सायकल सवारी

माकड माणसांप्रमाणेच एकदम परफेक्ट सायकल चालवत असल्याचे पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
शाळेचा यूनिफॉर्म आणि बॅग घेऊन माकडाची सायकल सवारी
शाळेचा यूनिफॉर्म आणि बॅग घेऊन माकडाची सायकल सवारीInstagram

नवी दिल्ली - सोशल मीडियावर सध्या एका माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे माकड सध्या चांगलेच चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये एक माकड छोटी सायकल चालवत असल्याचे दिसून येत आहे. माकडाने एक यूनिफॉर्म घातलेला आहे. यासोबतच या माकडाच्या पाठीवर एक छोटीशी बॅग देखील आहे. माकडाचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ helicopter_yatra_ नावाच्या एक इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.

अनेक यूजर्सने या व्हिडिओवर आपल्या मजेशीर कमेंटही केल्या आहेत. माकड माणसांप्रमाणेच एकदम परफेक्ट सायकल चालवत असल्याचे पाहून सगळेच थक्क झाले आहेत. माकडाने हिरव्या रंगाचा स्वेटशर्टप्रमाणे एक यूनिफॉर्म परिधान केला आहे. त्यासोबतच पाठीवर गुलाबी रंगाची बॅग घेऊन हे माकड सायकल चालवत आहे. दरम्यान, याआधी देखील माकड आणि एका लहान मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com