Monkeypox: वाढता धोका लक्षात घेता अमेरिकेत आरोग्य आणीबाणी घोषित

कोरोना नंतर आता जगावर मंकीपॉक्सचे संकट सुरु झाले आहे.
Monkeypox Update
Monkeypox Update SAAM TV

Monkeypox News: गेल्या दोन वर्षांत जगभरातील बहुतेक देशांमध्ये, कोरोनाव्हायरस (Corona) संसर्गाने हाहाकार माजवला आहे. अनेक देश अजूनही या विषाणूपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, त्यातच आता मंकीपॉक्सच्या (Monkeypox) वाढत्या रुग्णांमुळे जगभरात चिंता वाढली आहे. देशात मंकीपॉक्सचे रुग्ण खूप वेगाने वाढत आहेत.

अमेरिकेतही रुग्ण वाढत आहेत. अमेरिकेने गुरुवारी मंकीपॉक्सला (Monkeypox) सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. यावेळी रुगनांचा डेटा गोळा करणे आणि मंकिपॉक्स विरूद्धच्या लढ्यात अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आम्ही या विषाणूविरूद्ध लढन्यासाठी तयार आहोत. आम्ही प्रत्येक अमेरिकनला मंकीपॉक्स या आजाराला गांभीर्याने घेण्याचे आणि व्हायरसचा सामना करण्यास मदत करण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन करतो, अशी माहिती आरोग्य आणि मानव सेवा सचिव जेवियर बेसेरा यांनी दिली.

हे देखील पाहा -

ही घोषणा सध्या ९० दिवसांसाठी लागू आहे. ते आणखी वाढवता येईल. गुरुवारी देशभरात 6,600 नवीन रुग्ण नोंदवली आहेत. त्यापैकी सुमारे एक चतुर्थांश रुग्ण न्यूयॉर्कमधील आहेत. ही संख्या खूप अंकी वाढू शकते असे तज्ञांचे मत आहे.

यूएसने आत्तापर्यंत JYNNEOS लसीचे 600,000 डोस वितरित केले आहेत, जे मूळतः मंकीपॉक्स आणि चेचकांसाठी होते, परंतु लसीची सर्वात जास्त गरज असलेल्या अंदाजे 1.6 दशलक्ष लोकसंख्येचा उच्च धोका लक्षात घेता ही संख्या कमी आहे.

Monkeypox Update
दुर्दैवी : कामावरुन घरी जाताना काळाचा घाला; PMPML च्या धडकेत हमाल व्यावसायिकाचा मृत्यू

मंकीपॉक्स आजाराची लक्षणे :

मंकीपॉक्सची सामान्यत: लक्षणे ताप येणे,पुरळ आणि मोठ्या प्रमाणात गाठी (lymph node)येणे ही आहेत आणि त्यामुळे वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकतात.

पुरळ पोट किंवा पाठी ऐवजी चेहऱ्यावर आणि हातपायांवर जास्त केंद्रित असते. पुरळ मोठयाप्रमाणात चेहरा ( ९५% ), हाताचे तळवे आणि पायांचे तळवे (७५%), तोंडातील व्रण (७०%) , जननेंद्रिय (३०%) आणि डोळे (२०%) दिसते.

मंकीपॉक्स हा सामान्यतः स्वयं-मर्यादित आजार आहे. ज्याची लक्षणे 2 ते 4 आठवड्यांपर्यंत असतात. रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते.मृत्यू दर 1-10% पर्यंत असू शकतो.

लहान मुलांमध्ये या आजारची लक्षणं जास्त तीव्र आढळून येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com