धोका वाढला! हवेतूनही पसरू शकतो मंकीपॉक्स विषाणू अन्...; रिसर्चमधून खुलासा

जगभरात दिवसेंदिवस मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत आहेत. हा आजार जगभरातील ३० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे.
Monkeypox virus
Monkeypox virus Saam Tv

नवी दिल्ली : जगभरात दिवसेंदिवस मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत आहेत. हा आजार जगभरातील ३० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. जगभरात ८०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.मंकीपॉक्स (Monkeypox Virus) हा आजार हवेतून पसरू शकतो, असे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिलं आहे. ( Monkeypox Virus News)

Monkeypox virus
monkeypox virus : मंकीपॉक्सच्या 'त्या' संशयित रुग्णाचा रिपोर्ट अखेर आला

मंकीपॉक्स हा आजार नायजेरियाच्या एका कारागृहातील कैद्यांमध्ये पसरला होता. कैद्याव्यतिरिक्त आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही हा आजार पसरला होता. काही मंकीपॉक्सच्या रुग्णांना (Health) इतर मंकीपॉक्सबाधित रुग्णाच्या संपर्कात न येताही या आजाराची लागण झाली. त्यामुळे मंकीपॉक्स आजार हवेतून पसरू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने मंकीपॉक्स आजाराव मागे केलेल्या घोषणेवरून घुमजाव केल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्राने याआधी सुरुवातीला लोकांना मास्क घालण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, तो सल्ला मागे घेण्यात आला. यादरम्यान, ब्रिटेनच्या आरोग्य सुरक्षा संस्थेने मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णामुळे खबरदारी घेतली आहे. ब्रिटेनच्या एका जर्नलमध्ये मंकीपॉक्स रोग रोखण्यासाठी लवकरात लवकर उपाय करावे लागतील. तसेच संशयित रुग्णांना त्वरित विलगीकरण कक्षात ठेवायला पाहिजे.

Monkeypox virus
चिंताजनक! देशात मधुमेहाच्या रुग्णसंख्येत १५० टक्क्यांनी वाढ; ICMR च्या नव्या गाईडलाईन्स जारी

गरोदर महिलांना मंकीपॉक्सचा धोका ?

मंकीपॉक्सचा गरोदर महिलांना आणि त्यांच्या गर्भातील मुलांना अधिक धोका आहे. त्यासाठी कांगोमधील एका प्रकरणामुळे मंकीपॉक्सच्या रुग्णाचा हवाला देण्यात येत आहे. त्यामुळे मंकीपॉक्सने बाधित झालेल्या २१६ महिलांचा अभ्यास करण्यात आला. या महिलांमधील ४ किंवा ५ जणांचा गर्भपात झाला होता. त्यांच्या गर्भातील मुलांमध्ये मंकीपॉक्सचे विषाणू आढळून आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com