Monkeypox: मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास काय कराल? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

Monkeypox: मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास काय कराल? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
Monkeypox: मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास काय कराल? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
Monkeypox: मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास काय कराल? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्याSAAM TV

मुंबई/नवी दिल्ली: देशभरात मंकीपॉक्सचा धोका वाढत आहे. देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे चार रुग्ण आढळले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे आधी तीन रुग्ण सापडले आहेत, ते परदेशातून परतले आहेत. मात्र, दिल्लीत जो चौथा रुग्ण आढळला आहे, त्याचा कोणताही प्रवासाचा इतिहास नाही. (Monkeypox Update News in Marathi)

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार (WHO) जगभरात ७५ देशांत १६ हजारांहून अधिक मंकीपॉक्सचे (Monkeypox) रुग्ण आढळले आहेत. या विषाणूचा संसर्ग वाढल्यानंतर WHO ने ही जागतिक आणीबाणी घोषित केली आहे. मंकीपॉक्स हा आजार प्राण्यांतून माणसांमध्ये पसरणारा आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर शरीरावर मोठ्या फोड्या येतात. याची लक्षणे अनेक आहेत. मात्र, गंभीर आजाराचा धोका कमी असतो.

Monkeypox: मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास काय कराल? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
मंकीपॉक्स प्रकरणी WHO ची मोठी घोषणा! मंकीपॉक्स जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित

मंकीपॉक्स काय आहे?

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अर्थात CDC च्या नुसार, सर्वप्रथम या आजाराचे १९५८ मध्ये निदान झाले होते. त्यावेळी संशोधनासाठी ठेवण्यात आलेल्या माकडांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेले स्पष्ट झाले होते. त्यामुळेच या आजाराचे नाव मंकीपॉक्स ठेवण्यात आले आहे. सीडीसीनुसार, मंकीपॉक्स हा दुर्मिळ आजार आहे. हा विषाणू त्याच व्हेरियॉला व्हायरसमधीलच एक प्रकार आहे. त्यामुळे कांजिण्यासारखा म्हणजेच शरीरावर फोड्या येतात. मंकीपॉक्सचे लक्षण कांजिण्यांसारखीच आहेत. खूपच कमी प्रमाणात मंकीपॉक्स घातक असल्याचे समोर आले आहे.

Monkeypox: मंकीपॉक्सची लक्षणे दिसल्यास काय कराल? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
Monkeypox: मंकीपॉक्स संपूर्ण देशात फैलावणार का? ICMR च्या शास्त्रज्ज्ञांनी सांगितलं...

माणसांमध्ये संसर्ग कधी झाला?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मानवामध्ये पहिल्यांदा मंकीपॉक्सचा संसर्ग १९७० मध्ये झाला. कॉन्गोमध्ये राहणाऱ्या एका ९ वर्षीय मुलाला संसर्ग झाला होता. १९७० नंतर ११ आफ्रिकी देशांमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. जगभरात आफ्रिकेतून मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली होती. २००३ मध्ये अमेरिकेतही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये इस्रायल आणि ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले होते. मे २०१९ मध्ये सिंगापूरमध्येही नायजेरियातून आलेल्या व्यक्तीला मंकीपॉक्स झाल्याचे निदान झाले होते.

मंकीपॉक्सची लक्षणे कोणती?

मंकीपॉक्स विषाणूची लक्षणे ६ ते १३ दिवसांपर्यंतच्या कालावधीत दिसून येतात. अनेकदा ५ ते २१ दिवसांपर्यंतही ही लक्षणे दिसू लागतात. संसर्ग झाल्यानंतर पुढील पाच दिवसांमध्ये ताप, तीव्र डोकेदुखी, सूज, पाठदुखी, मांसपेशीत वेदना आणि थकवा यांसारखी लक्षणे दिसून येतात. मंकीपॉक्स सुरुवातीला चिकनपॉक्स, कांजिण्यासारखा दिसतो.

ताप आल्यानंतर एक ते तीन दिवसांनंतर त्वचेवर त्याचा परिणाम दिसायला लागतो. शरीरावर मोठ्या फोड्या दिसतात. शरीरावर येणाऱ्या मोठ्या फोड्यांची संख्या ही हजारांच्या घरातही असू शकते. संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला असेल तर, जोपर्यंत त्वचा सैल होत नाही, तोपर्यंत ते बरे होत नाहीत.

मंकीपॉक्सचा संसर्ग कसा होतो?

संसर्ग झालेल्या जनावराचे रक्त, त्याच्या शरीरातील घाम किंवा एखादा द्रवपदार्थ किंवा त्यांच्या जखमांच्या संपर्कात आल्यास माणसाला मंकीपॉक्सचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तो पसरतो. लैंगिक संबंधांतूनही मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ शकतो.

चाचणी करण्याची गरज कुणाला?

जर २१ दिवसांत कोणत्याही प्रादूर्भाव झालेल्या देशांतून प्रवास केला आणि मायदेशात परतल्यास लक्षणे दिसून आली तर, चाचणी करावी.

मंकीपॉक्सची लक्षणे दिसून येण्याचा कालावधी २१ दिवसांपर्यंत असतो. त्यामुळे या कालावधीत कोणतीही लक्षणे दिसल्यास चाचणी करू शकता. केंद्र सरकारने मंकीपॉक्सचा धोका लक्षात घेऊन खबरदारी म्हणून गाइडलाइन्स प्रसिद्ध केल्या आहेत, त्यानुसार, संशियत रुग्ण किंवा लक्षणे वाटल्यास सरकारी रुग्णालयात चाचणी करून घेता येईल.

मंकीपॉक्सवर उपचार काय?

जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, आतापर्यंत मंकीपॉक्सवर ठोस उपचार नाहीत. मात्र, कांजिण्याची लस बऱ्याच प्रमाणात परिणामकारक ठरली आहे. २०१९ मध्ये कांजिण्या आणि मंकीपॉक्सचा संसर्ग रोखण्यासाठी एका लशीला मंजुरी देण्यात आली होती, अशी माहिती आहे. पण ती अद्याप पूर्णपणे उपलब्ध होऊ शकली नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com