Monkey pox: ५ वर्षांच्या मुलीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे, जगभरात या नव्या आजाराने उडवलीय झोप

एका ५ वर्षांच्या मुलीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली आहेत.
Monkeypox Update News (File Photo)
Monkeypox Update News (File Photo)SAAM TV

गाझियाबाद: देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका ५ वर्षांच्या मुलीमध्ये मंकीपॉक्सची (Monkey Pox) लक्षणे आढळून आली आहेत. त्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या मुलीचे नमुने तात्काळ घेण्यात आले आहे. या मुलीच्या त्वचेला खाज येत आहे. तसेच तिच्या शरीरावर व्रणही आले आहेत.

गाझियाबादचे सीएमओंनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीला इतर कोणताही त्रास नाही. ती किंवा तिचा कोणताही नातेवाईक गेल्या महिनाभरात विदेशात गेलेला नाही किंवा विदेशातून घरी परतला नाही. (Monkeypox Update News 5 year old girl symptoms collected samples for testing)

Monkeypox Update News (File Photo)
Monkey Pox : जगभरात मंकीपॉक्स व्हायरसची दहशत ; पाहा हा Special Report

सीएमओंच्या माहितीनुसार, मुलीचे काही नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. पुढील २४ तासांत तपासणीचा अहवाल येणार आहे. मुलीला सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

या मुलीमध्ये आढळून आलेली लक्षणे इतर आजाराचीही असू शकतात, असेही सीएमओंनी सांगितले. मात्र, खबरदारी घेतली जात आहे. त्यादृष्टीने कार्यवाही केली जात आहे.

मंकीपॉक्सची लक्षणे

मंकीपॉक्स हा दुर्मिळ आजार आहे. फ्लू सारखी त्याची सुरुवातीची लक्षणे असतात. त्यात ताप येणे, डोकेदुखी, थंडी, मांसपेशींमध्ये वेदना, कंबरदुखी, थकवा आदी लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर चेहऱ्यावर फोड्या येण्यास सुरुवात होते. त्या शरीरावरील इतर भागांवरही पसरतात. ही लक्षणे संसर्गानंतर पाच दिवसांपासून २१ दिवसांपर्यंत आढळून येतात.

Monkeypox Update News (File Photo)
मंकीपॉक्स कसा होतो ? काय आहेत लक्षणं आणि उपचार ?

केंद्र सरकारनेही दिल्यात सूचना

दरम्यान, केंद्र सरकारनेही मंकीपॉक्ससंबंधी खबरदारी म्हणून गाइडलाइन्स (Guidelines) जारी केल्या आहेत. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी लवकरात लवकर ट्रेसिंग करण्यास सांगितले आहे. संशयित रुग्णांसाठी कंटेन्मेंट झोन निर्माण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com