
नवी दिल्ली: देशात कोरोना (Corona) संकटानंतर आता देशात मंकीपॉक्सचे संकट सुरू झाले आहे. देशात मंकीपॉक्सचे ८ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ५ जण परदेश दौरा करून परतले होते. आता या आजाराशी संबंधित लसीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेदरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांचे एक महत्त्वाचे विधान समोर आले आहे. मंकीपॉक्सच्या लसीवर संशोधन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अदर पूनावाला यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना ही माहिती दिली. आरोग्यमंत्र्यांनी राज्यसभेतही ही माहिती दिली. 'मंकीपॉक्सच्या लसीकरणावर सध्या संशोधन सुरू आहे. यामध्ये, संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांनाच लसीकरण करणे आवश्यक आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. (Monkeypox Vaccine)
केंद्र सरकारने मंकीपॉक्सबाबत (Monkeypox) मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. आता मंकीपॉक्सच्या संपर्कात आलेल्या लोकांना २१ दिवसांच्या विलगीकरणात राहण्याची आवश्यकता असेल. या जर एखाद्याला हा आजार झाला असेल तर त्याने त्वचा पूर्णपणे झाकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मास्क लावणेही बंधनकारक आहे.
मंकीपॉक्समुळे ताप, थंडी वाजून येणे, पुरळ आणि चेहऱ्यावर किंवा गुप्तांगांवर फोड येतात. तसेच संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने किंवा त्याचा प्रसार होतो. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे, लैंगिक संबंध ठेवणे किंवा त्याने वापरलेल्या वस्तू वापरणे यामुळे रोग पसरण्याचा धोका देखील असतो.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.