सावधान! कोरोनानंतर आता आणखी एका व्हायरसचं संकट? या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

Monkeypox Virus : एकीकडं संपूर्ण जग या महामारीसोबत लढा देत असताना आणखी एका व्हायरसने दहशत निर्माण केली आहे
सावधान! कोरोनानंतर आता आणखी एका व्हायरसचं संकट? या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
Monkeypox VirusSaam Tv

लंडन : देशात आलेली कोरोनाची (Corona) तिसरी लाट आता ओसरली असली तरी, चौथ्या लाटेचा (Corona 4th Wave) धोका अद्यापही कायम आहे. एकीकडं संपूर्ण जग या महामारीसोबत लढा देत असताना आणखी एका व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. कोरोनानंतर आता मंकीपॉक्स व्हायरसने संपूर्ण (Monkeypox Virus) चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये (Britain) मंकीपॉक्स व्हायरसचं प्रकरण समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ब्रिटनच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की, संक्रमित व्यक्ती नुकतीच नायजेरियातून आली आहे. त्यामुळे हा व्हायरस तेथूनच आला असल्याचा अंदाज आरोग्य तज्ञांनी लावला आहे.

Monkeypox Virus
कोरोनाचा 'सुपर स्पीड'! देशात गेल्या २४ तासांत ३२०७ नवे रुग्ण; २९ जणांचा मृत्यू

ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमित आढळलेल्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता ठिक आहे. दुसरीकडे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा देखील शोध घेतला जात आहे. एजन्सीचे क्लिनिकल आणि इमर्जिंग इन्फेक्शन्सचे संचालक डॉ. कॉलिन ब्राउन यांनी शनिवारी सांगितले की, "सदरील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांपर्यंत आम्ही पोहचत आहोत. जेणेकरून आम्ही त्यांना आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला देऊ"

दरम्यान, सध्या संक्रमित आढळलेल्या या रुग्णावर सेंट थॉमस हॉस्पिटलमधील विशेष युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयाचे डॉक्टर निकोलस प्राइस म्हणाले की, डॉक्टरांचे एक पथक रुग्णाच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?

डब्ल्यूएचओच्या मते, मंकीपॉक्स विषाणूच्या संसर्गानंतर त्याची लक्षणे दिसण्यासाठी 6 ते 13 दिवस लागू शकतात. संसर्ग झालेल्यांना ताप, तीव्र डोकेदुखी, पाठ आणि स्नायू दुखणे यासह तीव्र अशक्तपणा जाणवू शकतो. सर्वात सामान्य लक्षण म्हणजे लिम्फ नोड्सची सूज. आजारी व्यक्तीच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायांवर मोठे रॅशेस, पुरळ किंवा फोड येऊ लागतात. संसर्ग गंभीर असल्यास पुरळ डोळ्याच्या कॉर्नियावर देखील परिणाम करू शकतात. WHO च्या मते, मंकीपॉक्सवर सध्या कोणताही इलाज नाही. रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल तर हा व्हायरस घातक ठरू शकतो.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.