राज्यसभेत वेलमध्ये आले, घोषणा दिल्या; गदारोळ केल्यानं १९ खासदार निलंबित

राज्यसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून जोरदार गदारोळ करण्यात आला.
monsoon parliament session News
monsoon parliament session NewsSaam Tv

नवी दिल्ली: राज्यसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून जोरदार गदारोळ करण्यात आला. त्यानंतर एकूण १९ खासदारांना सभागृहातून एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी ही कारवाई केली.

खासदारांनी सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपसभापतींनी एका आठवड्यासाठी संबंधित खासदारांना निलंबित करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार, निलंबित केलेल्या खासदारांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (Congress) सुष्मिता देव, डॉ. शांतनु सेन आणि डोला सेन यांच्यासह इतर राज्यसभा खासदारांचा समावेश आहे. या खासदारांनी सभागृहातील वेलमध्ये प्रवेश करून घोषणाबाजी केली. त्यामुळे या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. (Monsoon parliament session News)

monsoon parliament session News
मुंबईची ओळख पुसण्याचा भाजपचा प्रयत्न; मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

विरोधी पक्षांच्या १९ खासदारांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे (Congress) खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी प्रतिक्रिया दिली. 'नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी लोकशाहीलाच निलंबित केली आहे. तुम्ही खासदारांबद्दल काय बोलत आहात? संसदेचे कामकाज विरोधक नाहीत, तर सरकार रोखत आहे.'

monsoon parliament session News
शिवसेना कुणाची?, उद्धव ठाकरेंना दिलासा; १ ऑगस्टला सुप्रीम कोर्ट सुनावणी घेणार

काँग्रेसचे ४ खासदार लोकसभेतून निलंबित

दरम्यान, यापूर्वी लोकसभेतून काँग्रेसच्या (Congress) चार खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यात मणिकम टागोर, टी. एन. प्रतापन, जोतिमणि आणि राम्या हरिदास यांचा समावेश आहे. त्यावर काँग्रेसने टीका केली होती. सरकार त्यांना झुकवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, काँग्रेस झुकणार नाही. लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनीही टीकास्त्र सोडलं होतं. सरकार विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच त्यांनी हा मार्ग अवलंबला आहे, असे ते म्हणाले.(Monsoon parliament session News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com