उत्तर कोरियात कोरोनाचा हाहाकार! अवघ्या ३ दिवसात ८ लाखांहून अधिक रुग्ण

उत्तर कोरियामध्ये कोरोना महामारीने आता धोकादायक रूप धारण केले आहे. तीन दिवसात देशभरात कोरोनाचे आठ लाखांहून अधिक नवे रुग्ण सापडले.
Kim Jong Un
Kim Jong UnSaam Tv

मागिल दोन वर्षात कोरोनाने (Corona) जगभर हाहाकार माजवला होता. पण त्यावेळी उत्तर कोरिया (North Korea) कोरोनाचा एकही रुग्ण नसलेला देश होता. आता उत्तर कोरियात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. तीनच दिवसात ८ लाखाहून अधिक रुग्ण कोरोना पॉझिटटिव्ह आले आहेत. उत्तर कोरियात आज रविवारी १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसात देशात कोरोनाचे ८२०,६२० रुग्ण आढळले. ज्यामध्ये किमान ३२४,५५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

"देशातील सर्व शहरे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. आणि औद्योगिक युनिट्स देखील बंद करण्यात आली आहेत." आता उत्तर कोरियामध्ये दररोज मोठ्या संख्येने कोरोनाचे (Corona) रुग्ण समोर येत आहेत, अशी माहिती उत्तर कोरियातील माध्यमांनी दिली आहे. किम जोंग उन यांनी लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्याचे आदेश दिले.

उत्तर कोरियाने (North Korea) यापूर्वी कोविड लसीसाठी चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या कोवॅक्स योजनेच्या ऑफर नाकारल्या होत्या, पण बीजिंगने मदत आणि लसींसाठी नवीन प्रस्ताव जारी केला आहे. उपचार मिळविण्यासाठी देश संघर्ष करत आहे. अस तज्ञांचे म्हणणे आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com