Milk Price Hike : सर्वसामान्यांना आणखी एक झटका! दुधाच्या दरात पुन्हा वाढ, वाचा किती रुपयांनी महागलं दूध?

आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे.
Milk Rate Latest News
Milk Rate Latest NewsSaam Tv

Milk Rate Hike : आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. कारण दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील (Delhi) मदर डेअरीने पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून नवीन दराने दूध खरेदी करावे लागणार आहे.  (Latest Marathi News)

Milk Rate Latest News
Tushar Gandhi : महात्मा गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी गोडसेंना बंदूक पुरवली; तुषार गांधींचं खळबळजनक ट्विट

मदर डेअरीने फुल क्रीम दुधाच्या दरात (Milk Price) लिटरमागे एक रुपयांनी वाढ केली आहे. त्याचबरोबर टोकनयुक्त दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याआधी ऑक्‍टोबर महिन्यात मदर डेअरीने फुल क्रीम दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली होती. आता एक लिटर फुल क्रीम दूध ६४ रुपये झाले आहे. त्याचबरोबर आता टोकन दूध ५० रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. (Milk Price Today News)

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून टोकनयुक्त दुधाची किंमत प्रति लिटर ५० रुपये असेल. सध्या ते ४८ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. दुधाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे देशांतर्गत अर्थसंकल्पावर परिणाम होईल कारण यावेळी अन्नधान्य महागाई आधीच जास्त आहे. मदर डेअरीने दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकडून कच्च्या दुधाच्या खरेदीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com