Uttar Pradesh Crime News: मुलगा सर्व पगार बायकोवर खर्च करतो म्हणून सासू भडकली; सुनेची सुपारी देत केली निर्घृण हत्या

Mother in law killed daughter in law: तपासात सासूला अटक केल्यानंतर तिने स्वत: आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime NewsSaam TV

Uttar Pradesh:

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका सासूने आपल्या सुनेची सुपारी देत गोळ्या झाडून तिची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. पोलिसांनी सासूला ताब्यात घेतलंय. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे ही घटना घडली आहे. पोलिसांना महिलेच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू केला. तपासात सासूला अटक केल्यानंतर तिने स्वत: आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Uttar Pradesh Crime News
Mumbai Crime News : कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपनीचा वारंवार फोन, संतापलेल्या कर्जदाराच्या कृत्याने अख्खी कंपनी हादरली

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 5 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास पती घरी नसताना दुचाकीवरुन काही जण महिलेच्या घरात घुसले. घरात आल्याबरोबर त्यांनी तिच्यावर गोळ्या झाड्यात तिची हत्या केली. गोळ्या झाडून त्यांनी तातडीने तेथून पळ काढला.

यावेळी महिला तेथेच पडून होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असतानाच तिचा मृत्यू झाला. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. चौकशी दरम्यान, त्यांनी हल्लेखोरांना अटक केली.

Uttar Pradesh Crime News
Nanded Crime News: खळबळजनक! ५० लाखांची खंडणी न दिल्याने परभणीतील बालकाची नांदेडमध्ये हत्या; दोरीने हातपाय बांधले अन्...

हल्लेखोरांना अटक केल्यावर सासूचे नाव समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे या आधी एका व्यक्तीसोबत लग्न झाले होते. हा तिचा दुसरा विवाह होता. याबाबत तिने आपल्या दुसऱ्या पतीला काहीच माहिती दिली नव्हती. तसेच मुलगा त्याचा सर्व पगार पत्नीवर खर्च करत होता. याचा सासूला राग येत होता. शेवटी सुपारी देऊन सूनेची हत्या करण्याचा निर्णय सासूने घेतला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com