Shocking News : उलट्या काळजाची आई...पोटच्या मुलाला टेरेसवरून फेकलं; शेजाऱ्यासोबतचे कनेक्शन उघड

Madhya Pradesh Crime : तीन वर्षांचा मुलगा खेळता खेळता टेरेसवरून पडला असा बनाव हे क्रूर कृत्य करणाऱ्या आईनंच रचला होता.
Gwalior Crime News
Gwalior Crime NewsSAAM TV

Madhya Pradesh Crime News :

आपल्या पोटच्या गोळ्याला थोडंसं जरी खरचटलं तरी, आईचा जीव कासावीस होतो. काय करू आणि काय नको, अशी अवस्था तिची होते. पण मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये याउलट घटना घडलीय. उलट्या काळजाच्या आईनं आपल्या पोटच्या गोळ्याचाच जीव घेतला. शेजाऱ्यासोबत नको त्या अवस्थेत मुलानं बघितलं. आपलं पितळ उघडं पडेल या भीतीनं तिनं अवघ्या ३ वर्षांच्या बालकाला टेरेसवरून फेकलं आणि त्याचा जीव घेतला. (Crime News)

चार महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. तीन वर्षांचा मुलगा खेळता खेळता टेरेसवरून पडला असा बनाव हे क्रूर कृत्य करणाऱ्या आईनंच रचला होता. पण केलेला गुन्हा कधी लपत नाही. भयंकर कृत्य करणाऱ्या महिलेनंच आपल्या गुन्ह्याची कबुली नवऱ्याकडे दिलीय. शेजाऱ्यासोबत या मुलानं तिला नको त्या अवस्थेत बघितलं होतं. आपलं पितळ उघडं पडेल या भीतीनं तिनं आपल्या मुलाला टेरेसवरून फेकलं.

नेमकं काय घडलं?...

२८ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. आरोपी महिलेचा पती पोलीस कर्मचारी आहे. त्यानं नव्यानं सुरू केलेल्या शॉपचं उद्घाटन होतं. सर्वांनाच निमंत्रित केलं होतं. शेजाऱ्यालाही बोलावलं. पण तोच आपल्या पत्नीचा प्रियकर आहे, हे त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं. सगळ्यांचीच लगबग सुरू होती. सगळ्यांच्या नजरा चुकवून पत्नी आणि तिचा प्रियकर टेरेसवर पोहोचले.

Gwalior Crime News
Pimpri Chinchwad Crime News : अंमली पदार्थ विकणाऱ्या राजस्थानच्या युवकांना पुण्यात अटक

३ वर्षांचा चिमुकला आपल्या आईच्या मागोमाग टेरेसवर पोहोचला. तो आपल्या मागे आलाय याची पुसटशी कल्पनाही तिला नव्हती. त्या दोघांना या मुलानं नको त्या अवस्थेत बघितलं. आपल्या मुलानं हा प्रकार बघितला हे समजल्यावर तिला काहीच सूचेनासं झालं. आपलं पितळ उघडं पडू नये म्हणून तिनं मुलाला टेरेसवरून खाली फेकून दिलं. (Love Affair)

यात मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला मार लागला होता. तिथल्याच एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. पण दुसऱ्याच दिवशी तो मरण पावला. आपल्याच निष्काळजीपणामुळं आणि दुर्लक्षामुळं मुलाला गमावलं, असा समज दुःखात बुडालेल्या बापाचा झाला.

Gwalior Crime News
Gautami Mumbai Program: गौतमीच्या कार्यक्रमात तरुणाचा राडा; स्टेजखाली प्रेक्षकांनीच कुटलं

मुलगा स्वप्नात येऊ लागला

काही दिवसांनी आरोपी महिलेला भयानक स्वप्न पडू लागले होते. तिच्या स्वप्नात मुलगा येत होता. तिची झोप उडाली होती. या भयंकर कृत्याची कबुली तिनं आपल्या पतीकडं दिली. पतीनं तिचा जबाब रेकॉर्ड केला. तसंच व्हिडिओ रेकॉर्डिंगही केलं. थाटीपूर पोलिसांकडे हे सर्व पुरावे सोपवले. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com