'फक्त ११ लाखांसाठी राऊतांना त्रास...'; ईडीच्या कारवाईवर जया बच्चन यांची संतप्त प्रतिक्रिया

ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी संजय राऊत यांच्या अटकेवर संताप व्यक्त केला आहे.
MP Jaya Bachchan Statement
MP Jaya Bachchan StatementSaam TV

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना केवळ ११ लाख रुपयांसाठी त्रास दिला जात आहे. असं म्हणत खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी ईडीच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला आहे.

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भांडूप येथील निवासस्थानी धाड टाकून त्यांची तब्बल नऊ तास चौकशी केली. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली. राऊतांना अटक केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

पाहा व्हिडीओ -

राऊतांच्या अटकेमुळे राज्याची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच आता ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी संजय राऊत यांच्या अटकेवर संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत यांना केवळ ११ लाख रुपयांसाठी त्रास दिला जात आहे शिवाय हे सर्व २०२४ पर्यंत सुरू राहणार असल्याचं जया बच्चन म्हटल्या आहेत.

जया बच्चन यांचा एक व्हिडीओ ट्विटरवर सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांना राऊतांना ईडीने केलेल्या अटकेबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. राऊतांची अटक हा ईडीचा दुरुपयोग असल्याचं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न बच्चन यांना विचारला असता त्या म्हणाल्या, 'ईडीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, ११ लाख रुपयांसाठी तुम्ही अशा प्रकारे कुणाला तरी त्रास देत आहात.

MP Jaya Bachchan Statement
Aurangabad : 'भाजपमध्ये गेल्यावर ED ने कारवाई केल्याचं दाखवा अन् १० लाख जिंका'

तसंच संजय राऊत यांची आई खूप वयस्कर आहे, असं विचारलं असता होय, मला माहीत आहे. तसंच ईडीचा वापर कधीपर्यंत चालेल असं तुम्हाला वाटतं? असा सवाल केला असता, हे सर्व कधीपर्यंत चालेल असं विचारलं असता त्या म्हणाल्या हे सर्व २०२४ पर्यंत चालणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com