Gas Cylinder Explosion
Gas Cylinder ExplosionSaam Tv

Gas Cylinder Explosion : भयंकर घटना! लग्नाच्या कार्यक्रमात सिलिंडरचा भीषण स्फोट; दु:खात बदललं आनंदाचं वातावरण

या घटनेमुळे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Gas Cylinder Explosion News : काही महिन्यांपूर्वी राजस्थानच्या जोधपूरमध्येही लग्नाच्या कार्यक्रमात घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 35 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या भिंडमध्येही घडली आहे.

लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान घरात ठेवलेल्या छोट्या गॅस सिलिंडरचा (Gas Cylinder) अचानक स्फोट झाला. या स्फोटात नवरदेवाची आई, मावशी, वहिनी आणि दोन बहिणींचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. क्षणार्धात झालेल्या या स्फोटाने कुटुंबाला आयुष्यभराचे दुःख दिले आहे.

Gas Cylinder Explosion
Ulhasnagar : किरकाेळ कारणावरुन उल्हासनगरातील इमली पाड्यात युवकाची हत्या

ही घटना भिंडच्या काचणव काला गावात घडली आहे. भिंड जिल्ह्यातील गोरमी भागातील कचनाव कला गावात राहणाऱ्या रिंकू यादवचे 22 फेब्रुवारीलालग्ना होणार होते. 20 फेब्रुवारी रोजी लग्नाचे इतर कार्यक्रम सुरु होते. रिंकूच्या घरी कुटुंबाव्यतिरिक्त इतर नातेवाईक आणि गावातील लोक उपस्थित होते. लोकांसाठी जेवण तयार केले जात होते.

या दरम्यान लहान गॅस सिलिंडरचा वापर स्वयंपाकासाठी केला जात होता आणि अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत रिंकू यादवची आई, वहिनी, मावशी आणि दोन विवाहित बहिणींसह १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Gas Cylinder Explosion
Beed Onion News : कांद्याने आणलं शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, १७ गोण्या कांदा विकला अन् हाती पडला १ रुपया!

या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८ जणांची त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ग्वाल्हेरला रेफर करण्यात आले. मात्र, रिंकू यादवची आई, वहिनी,मावशी आणि दोन्ही बहिणींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दिल्लीतील (Delhi) एम्समध्ये पाठवण्यात आले. या पाचही महिलांवर एम्समध्ये उपचार सुरू होते.

मात्र, उपचारादरम्यान या पाचही महिलांचा मृत्यू झाला. ही बातमी कुटुंबियांना कळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बुधवारी सकाळी सर्वांचे मृतदेह गावात आणण्यात आले. यानंतर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com