Viral Video : प्रेमात मिळाला मोठा धोका; मग तरुणीने भर चौकात केली ही लाजिरवाणी गोष्ट, व्हिडिओ व्हायरल

येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना शिवीगाळ करत ती चक्क चालत्या कारच्या बोनेटवर बसते.
Viral Video
Viral Video Saam TV

MP Viral Video : प्रेमात खूप ताकत असते. व्यक्ती प्रेमासाठी कोणतीही गोष्ट करण्यास तयार असतात. काही जण तर प्रेमात चंद्र, तारे तोडून आणण्याच्या गोष्टी देखील करतात. अशात प्रेमात धोका मिळाल्यावर होणारं दु:ख शब्दात व्यक्त करता येत नाही. आजवर तुम्हीही कधीना कधी प्रेमात पडले असाल आणि एकदातरी तुमचं ब्रेकअप (Breakup) झालं असेल. मात्र तुम्ही हे दु:ख रस्त्यावर ओरडून सांगितलं आहे का? सध्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये ब्रेकअप झाल्याने ती बेभान झालेली दिसत आहे. (Girlfriend Drama)

समोर आलेला व्हिडिओ हा मध्यप्रदेशमधील ग्वालेहर या शहरातील असल्याचे समजले आहे. सुशील कौशिक यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही २५ वर्षीय तरुणी पूर्णत: अवाक्याबाहेर गेली आहे. ती रस्त्यावर भर चौकात ड्राम करत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना शिवीगाळ करत ती चक्क चालत्या कारच्या बोनेटवर बसते. त्यानंतर एका दुचाकी चालकाला थांबवून त्याच्याकडून दूचाकी घेते आणि त्याला निघून जाण्यास सांगते.

Viral Video
Sanagali Crime News: बापरे! डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला तपासून केलं मृत घोषित; भावाला राग अनावर होताच उचललं मोठं पाऊल, VIDEO

तसेत रस्त्यावर नुसता गोंधळ घालते. तिचं हे असं वागणं तिथे असलेल्या काही व्यक्तींनी आपल्या फोनमध्ये कैद केलं आहे. तरुणी भरचौकात इतकी बेभान झाली की, तिला थांबवण्यासाठी थेट पोलिसांना बोलवावे लागले.

सुशील यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे की, " मुलीचा हाय व्होल्टेज ड्रामा. फुलबाग चौकात एका मुलीने गोंधळ घातला. हा सर्व गोंधळ सुरु असताना तरुणीला तिच्या प्रियकराने फसवलं आहे. असं ती सांगत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी तरुणीला नेल्यानंतर या प्रकरणी अधिक माहिती मिळालेली नाही. मात्र आता हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतो आहे.

Viral Video
Airoli Crime Video : निर्दयीपणाचा कळस! ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मारहाण; धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com