Mukesh Ambani - Gautam Adani: मुकेश अंबानींनी गौतम अदानींना टाकलं मागे, सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत कोण कितव्या स्थानी?

आता मुकेश अंबानी यांनी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानींना मागे टाकले आहे.
Mukesh Ambani-Gautam Adani
Mukesh Ambani-Gautam AdaniSaam TV

Mukesh Ambani Richest Person in India: अदानी समुहाचे प्रमुख गौतमी अदानी जगातील श्रीमंत व्यक्ती बनतील असं काही महिन्यांपूर्वी वाटत होतं. मात्र अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा एक रिपोर्ट समोर आला अदानींच्या संपत्तीत प्रचंड वेगाने घसरण झाली.

अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचले होते. मात्र आता मुकेश अंबानी यांनी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानींना मागे टाकले आहे.

Mukesh Ambani-Gautam Adani
Budget 2023 : अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक मुद्दे, वाचा सविस्तर

गौतम अदानी यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांची एकूण संपत्ती 83.9 अब्ज डॉलर इतकी खाली आली आहे. त्याचवेळी मुकेश अंबानी यांनी आता 84.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गौतम अदानींना मागे टाकले आहे. फोर्ब्सच्या या यादीत अदानी 10 व्या क्रमांकावर पोहोचले आहेत, तर मुकेश अंबानी 9व्या क्रमांकावर आहेत.

Mukesh Ambani-Gautam Adani
Budget 2023 : मोबाइल, टीव्ही अन् बरंच काही; वाचा काय स्वस्त आणि काय झालं महाग?

अदानींना मागील 24 तासांत 10 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते आणि नंतर ते चौथ्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर घसरले. टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत मागे राहिलेल्या अदानीही एका दिवसात सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्या अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत.

20.8 अब्ज डॉलर्सच्या एका दिवसाच्या घसरणीनंतर, ते एलोन मस्क, जेफ बेझोस आणि मार्क झुकरबर्ग यांच्या पंक्तीत सामील झाले आहेत. इलॉन मस्क यांनी एका दिवसात सर्वाधिक 35 अब्ज डॉलर, मार्क झुकरबर्ग 31 अब्ज डॉलर आणि जेफ बेझोस 20.5 अब्ज डॉलर गमावले होते.

जगातील इतर श्रीमंत व्यक्ती

  1. बर्नार्ड अर्नॉल्ट - 214 अब्ज डॉलर्स

  2. इलॉन मस्क - 178.3 अब्ज डॉलर्स

  3. जेफ बेझोस - 126.3 अब्ज डॉलर्स

  4. लॅरी एलिसन - 111.9 अब्ज डॉलर्स

  5. वॉरेन बफे- 108.5 अब्ज डॉलर्स

  6. बिल गेट्स - 104.5 अब्ज डॉलर्स

  7. कार्लोस स्लिम हेलू- 91.7 अब्ज डॉलर्स

  8. लॅरी पेज - 85.8 अब्ज डॉलर्स

  9. मुकेश अंबानी - 84.3 अब्ज डॉलर्स

  10. गौतम अदानी- 83.9 अब्ज डॉलर्स

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com