Mulayam Singh Yadav: मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली, ICUमध्ये उपचार सुरु

डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. अखिलेश यादव लखनौहून दिल्लीला रवाना झाले आहेत.
Mulayam Singh YAdav
Mulayam Singh YAdavSaam TV

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुलायम सिंह यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. अखिलेश यादव देखील (Akhilesh Yadav) लखनौहून दिल्लीला रवाना झाले आहेत. शिवपाल सिंह यादव हे देखील दिल्लीत आहेत. मेदांता हॉस्पिटलमध्ये डॉ. सुशीला कटारिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (National News)

Mulayam Singh YAdav
Firing On Airplane: 3500 फूट उंचीवर विमानावर गोळीबार, 63 प्रवाशांसह उडणाऱ्या विमानात पुढे जे घडलं...

यादव कुटुंबीय दिल्लीला पोहोचू लागले आहेत. घरातील सदस्य एकापाठोपाठ एक येत असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. मुलायमसिंह यादव हे बऱ्याच दिवसांपासून मेदांता रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या वर्षीही त्यांना पोटदुखीमुळे मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आजारपणामुळे मुलायम सिंह हे राजकारणातही सक्रिय नाहीत. मात्र उत्तर प्रदेशमधील निवडणुकीदरम्यान ते सपा नेत्यांना प्रोत्साहन देताना दिसले. त्याचबरोबर अखिलेश यादवही त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेतात.

Mulayam Singh YAdav
फुटबॉलच्या इतिहासातील काळरात्र; इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार, १२७ जणांचा मृत्यू

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 7:30 च्या सुमारास मुलायम सिंह यादव यांचे हेल्थ बुलेटिन जारी केले जाऊ शकते, ज्यामध्ये त्यांच्या आरोग्याची स्थिती स्पष्ट होऊ शकते. समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या नजरा आता हेल्थ बुलेटिनकडे लागल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com