Mumbai: सोनं तस्करांची अनोखी शक्कल, कस्टम अधिकारीही चक्रावले; कोटींचं सोनं जप्त

सीमाशुल्क विभागाला गेल्या दोन दिवसांत सहा प्रकरणांमध्ये एकूण 4.53 कोटी रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले आहे.
File photo
File photoSaam Tv

Mumbai News: मुंबई विमानतळ (Mumbai Airport) सीमाशुल्क विभागाला मोठे यश मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने गेल्या दोन दिवसांत सहा प्रकरणांमध्ये एकूण 4.53 कोटी रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले आहे.

File photo
Latur: बाब्बो! चार गावाच्या शेतकऱ्यांनी तब्बल 500 एकर सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर

पहिल्या प्रकरणात, दुबईहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून 2.14 कोटी रुपयांचे 4.5 किलो जप्त करण्यात आले आहे. दुसऱ्यामध्ये, एका फ्लाइटमधून 1.4 किलो वजनाचे आणि 72.79 लाख रुपये किमतीचे 24 कॅरेट सोन्याचे बार जप्त करण्यात आले. तिसर्‍या प्रकरणात अधिकाऱ्यांनी 18.90 लाख रुपयांचे 365 ग्रॅम सोने जप्त केले आहे. तर चौथ्या घटनेत एका प्रवाशाने ट्रॉली बॅगच्या चाकात 36.28 लाख रुपये किमतीच्या 699.20 ग्रॅमच्या चार सोन्याच्या अंगठ्या पळविल्याचे आढळून आले.

पाचव्या प्रकरणात एका प्रवाशाकडून 42.28 लाख रुपये किमतीचे 816 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कट्टे जप्त करण्यात आले. शेवटच्या प्रकरणात, एका प्रवाशाकडून 1.3 किलो वजनाचे 68.09 लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com