Unique Marriage News: एका लग्नाची गोष्ट! मुस्लीम जोडप्याचा मंदिरात निकाह; एवढा मोठा निर्णय घेण्यामागचं कारणही सांगितलं

मुस्लिम जोडप्याच्या लग्नात दोन्ही समाजातील लोकांनी एकत्र येत नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या.
Unique Marriage News
Unique Marriage NewsSaam TV

शिमला : एका मुस्लीम जोडप्याने आपला लग्न (निकाह) थाटामाटात हिंदू मंदिर परिसरात केलं आहे. शिमला येथील रामपूरमध्ये हा लग्न सोहळा पार पडला. इस्लामी विधीनुसार निकाह पार पडला. मात्र मंदिराच्या आवारात मुस्लिम जोडप्याचा हा विवाह चर्चेचा विषय ठरला. मुस्लिम जोडप्याच्या लग्नात दोन्ही समाजातील लोकांनी एकत्र येत नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषद संचलित ठाकूर सत्यनारायण मंदिर परिसरात हा अनोखा विवाह पार पडला. मंदिराच्या आवारात मौलवी, साक्षीदार आणि वकील यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.  (Latest News Update)

ठाकूर सत्यनारायण मंदिर ट्रस्ट रामपूरचे सरचिटणीस विनय शर्मा यांनी एएनआयला सांगितले की, विश्व हिंदू परिषद आणि आरएसएसवर अनेकदा मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप केला जातो. आमच्या उपस्थितीत येथे एका मुस्लिम जोडप्याने लग्न केले. सनातन धर्म सदैव सर्वांना समाविष्ट करून पुढे जाण्याची प्रेरणा देतो याचेच हे उदाहरण आहे.

Unique Marriage News
Ramdas Kadam: मुख्यमंत्र्यांची जीभ हासडण्याची हिंमत आहे का? रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Marriage
Marriage Saam TV

लोकांमध्ये धार्मिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देणे हा मंदिर परिसरात हा विवाह लावण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. वधूचे वडील महेंद्र सिंह मलिक यांनी सांगितले की, मुलीचा विवाह रामपूरच्या सत्यनारायण मंदिर परिसरात पार पडला. शहरातील लोकांनी आम्हाला सकारात्मक पाठिंबा दिला आहे.

Unique Marriage News
क्रूरतेचा कळस! मुलीशी आधी Instagramवर मैत्री, त्यानंतर अत्याचार, मारहाण आणि ब्लेडने शरीरावर...

या विवाहाच्या माध्यमातून रामपूरच्या जनतेला बंधुभावाचा संदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटलं की, दोन्ही समाजाच्या लोकांनी एकमेकांची दिशाभूल करू नये. त्यांची मुलगी एम.टेक सिव्हिल इंजिनियर आणि सुवर्णपदक विजेती आहे आणि त्यांचा जावई सिव्हिल इंजिनियर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com