सोशल मीडियावरील मैत्रीचा शेवट बलात्काराने; नागपूरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार
सोशल मीडियावरील मैत्रीचा शेवट बलात्काराने; नागपूरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार Saam Tv

सोशल मीडियावरील मैत्रीचा शेवट बलात्काराने; नागपूरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाने महाराष्ट्रातील नागपूर येथे राहणाऱ्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे.

बैतूल: मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाने महाराष्ट्रातील नागपूर येथे राहणाऱ्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली होती. बैतूल फिरण्याच्या बहाण्याने तिला आरोपीने बोलावून घेतले आणि तिथेच बलात्कार केला.

पीडित मुलगी आणि बैतुलमधील १७ वर्षीय मुलाची सोशल मीडियावर ओळख झाली होती. बरेच दिवस ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. आठ नोव्हेंबरला त्याने मुलीला महाराष्ट्रातून बैतुल जिल्ह्यात बोलावून घेतले. मुलताई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभात पट्टन येथे बोलावून घेतल्यानंतर मुलाने तिला बैतूल फिरवण्यास नेले. त्यानंतर तो मुलगा मुलीला बैतूल येथील खंजनपूर परिसरात आपल्या एका मित्राच्या घरी घेऊन गेला. तिथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला.

सोशल मीडियावरील मैत्रीचा शेवट बलात्काराने; नागपूरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार
इंदौर ठरले देशातील सर्वात स्वच्छ शहर; राज्यातील 'या' शहराला मिळाला पुरस्कार

या घटनेनंतर मुलीची तब्येत बिघडली. तिला उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. स्थानीक पोलिसांना हा प्रकार संशयास्पद वाटला त्यांनी लगेच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच रुग्णालयात धाव घेतली आणि त्यानंतर मुलीकडे विचारणा केली असता, धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तिच्यावर अत्याचार झाल्याने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला असल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवला आणि त्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला त्वरीत ताब्यात घेतले. याबाबत मुलीच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर पीडितेचे कुटुंबीय बैतूलला पोहोचले. त्यांनी मुलीला नागपूरमधील रुग्णालयात उपचारासाठी आणले. आरोपीच्या चौकशीनंतर त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com