Narendra Modi News: PM मोदींच्या सुरक्षेत दुसऱ्यांदा मोठी चूक; सुरक्षाकवच भेदून तरूण...

. तीन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत दुसऱ्यांदा मोठी चूक झाली आहे.
Narendra Modi News
Narendra Modi News Saam tv

Karnataka Latest News : कर्नाटकात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याची घटना घडली आहे. कर्नाटकात नरेंद्र मोदी यांच्या एका तरुणाने सुरक्षाकवच भेदून कारजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. तीन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत दुसऱ्यांदा मोठी चूक झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सुरक्षाकवच भेदणाऱ्या तरुणाची चौकशी सुरू केली आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. कर्नाटकच्या दौऱ्यात नरेंद्र मोदी यांनी रॅली काढली. या रॅलीतून जात असताना एका तरुणाने सुरक्षकवच भेदून मोदींच्या कारजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी उपस्थित पोलिसांनी तरुणाला पकडले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा एजन्सीने या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. सुरक्षाकवच भेदल्याप्रकरणी तरुणाची चौकशी सुरू करण्यात येत आहे. या तरुणाबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.

कर्नाटकातील दावणगेरे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो सुरू होता. रस्त्याच्या दुर्तफा लोकांची गर्दी होती आणि घोषणाबाजी सुरू होत्या. याचदरम्यान, एक तरुणाने सुरक्षाकवच भेदून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. सुरक्षाकवच भेदल्यामुळे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

हुबळीत काय घडलं होतं?

दरम्यान, याआधी जानेवारी महिन्यात कर्नाटक महिन्यात हुबळीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो होता. त्यावेळी एक लहान मुलगा नरेंद्र मोदी यांच्याजवळ आला.

सहावी इयत्तेत शिकणाऱ्या मुलाला नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात हार घालायचा होता. त्यासाठी मुलगा नरेंद्र मोदी यांच्याजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्यावेळी तैनात एसपीजीच्या जवानांनी त्या मुलाला अडवलं. त्याच्याकडून हार घेऊन त्याला पुन्हा माघारी पाठवलं.

Narendra Modi News
Rahul Gandhi Vs BJP : हरले तर लोकशाही कमकुवत आणि जिंकले तर... ; भाजपने राहुल गांधींची हिस्ट्रीच काढली!

हुबळीच्या या घटनेला चूक मानन्यात आली होती. मात्र, कर्नाटक पोलिसांनी या ही सूरक्षेची चूक असल्याचे मान्य केले नाही. कुणाल धोंगडे या नावाच्या मुलाने नरेंद्र मोदींना हार घालण्यासाठी प्रयत्न केला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com