PM मोदीचा: पंतप्रधानांचा आज वाराणसी दौरा

पंतप्रधानांचा आज वाराणसी दौरा
PM मोदीचा: पंतप्रधानांचा आज वाराणसी दौरा
PM मोदीचा: पंतप्रधानांचा आज वाराणसी दौराSaam Tv

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi आपल्या लोकसभा मतदारसंघाचा म्हणजे वाराणसीचा Varanasi दौरा आज करणार असून, त्या निमित्त १५०० कोटींच्या विकास कामांचे उद्धाटन व लोकार्पण करणार आहे. Narendra Modi Prime Minister Varanasi

पुढील वर्षी सुरुवातीलाच उत्तर प्रदेशमधील Uttar Pradesh विधानसभा निवडणुका Elections होणार असून, त्याची आतापासूनच वाजत तयारी आहे. यामुळे पंतप्रधानांचा आजचा दौरा हा महत्वाचा ठरणार आहे. पंतप्रधान आपल्या दौऱ्यामध्ये विविध विकास कार्यक्रमांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहे. यामध्ये बनारस हिंदू विद्यापीठ Banaras Hindu University मधील १०० बेड्सच्या एमसीएच MCH विंगचे लोकार्पण करण्यात येणार आहे. आज ११ वाजता हा कार्यक्रम झाला आहे.

हे देखील पहा-

गौदौलिया मधील एक बहुस्तरीय पार्किंग, गंगा नदी पर्यटनाच्या विकास कामाच्या नवीन रो- रो नौका व वाराणासी- गाजीपूर महामार्गावर ३ लेनच्या फ्लाय ओव्हर बरोबर विविध कामांचे लोकार्पण मोदीजींच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्यामध्ये एकूण ७४४ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले आहे, तर ८३९ कोटी रुपयांच्या कामांची पायाभरणी करण्यात आली आहे. Narendra Modi Prime Minister Varanasi

PM मोदीचा: पंतप्रधानांचा आज वाराणसी दौरा
निरव मोदीचा अलिबागमधला आलिशान बंगला पडणार 

यामध्ये सेंटर फॉर स्कील अँनड्टेक्निकल सपोर्ट ऑफ सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग, जल जीवन मिशन योजने अंतर्गत १४३ ग्रामीण परियोजना आणि कारखियांव या गावामध्ये भाज्यांच्या पॅकिंग करणाऱ्या हाऊसचे उद्घाटन अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा समावेश आहे. दुपारी १२ वाजून १५ मिनीटांनी पंतप्रधान इंटरनॅशनल को- ऑपरेशन आणि कन्व्हेंशन सेंटरचे उद्घाटन केलं आहे. या सेंटरची निर्मिती जपानच्या साह्याने करण्यात आली आहे.

यानंतर पंतप्रधान मोदीजी बनारस हिंदू विद्यापीठ मधील माता आणि बाल आरोग्य केंद्राची पाहणी करणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान हे कोरोना काळात करण्यात आलेल्या उपाययोजनेचा आढावा घेणार असून, त्या मधील विविध अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करणार आहेत, आणि दुपारी ३ वाजता पंतप्रधान मोदी पुन्हा दिल्लीकडे प्रस्थान होणार आहेत. Narendra Modi Prime Minister Varanasi

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com