
अयोध्या : राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election) पार पडल्यानंतर आता सर्वं राजकीय पक्षांना विधान परिषदेसह राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. राज्यासह देश पातळीवर भाजपविरोधी पक्षांनी या निवडणुकांसाठी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. देशपातळीवरील विरोधकांच्या आघाडीतर्फे राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव चर्चेत असतानाच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपनेच शरद पवारांना राष्ट्रपतीपदासाठीची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, ' शरद पवार हे या देशाचे मोठे नेते आहेत. देशात आजघडीला सर्वाधिक अनुभवी नेते पवार आहेत. या निवडणुका येतात तेव्हा आम्ही सगळे पवार साहेबांचे (Sharad Pawar) मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतो. शरद पवार हे असे नेते आहेत त्यांची निवड सर्वसंमतीने होऊ शकते.
तसंच देशाला आदर्श राष्ट्रपती, उत्तम प्रशासक हवे असतील, तर सरकारने राष्ट्रपती पदासाठी पवारांना उमेदवार म्हणून निवडावे. पवार हे सगळ्यात अनुभवी नेते आहेत, अजिंक्य नेते आहेत. त्यामुळे शरद पवारांना भाजपने राष्ट्रपतीपदाची उमेदवारी द्यायला हवी, मात्र अशी संधी देण्यासाठी राज्यकर्त्यांचं मन मोठं असेल तर अशा नेत्यांना पाठबळ मिळतं. तसंच या गोष्टीला शरद पवार साहेबांनी मान्यता दिली पाहिजे, तरच पावले पडू शकतात असंही राऊत म्हणाले.
विरोधी पक्षांच्या ऐक्याचा प्रश्न होता, त्यावेळी प्रमुख नेत्याना धुरा सांभाळायला हवी. राष्ट्रपतीपदासाठी सगळे एकत्र येत असतील आणि देशाला उत्तम राष्ट्रपती हवे असतील शरद पवार हे एकच नाव समोर येतं आहे आणि पवारांचे नाव मोदीही मान्य करतील असा विश्वास देखील राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.
हे देखील पाहा -
मी जेव्हा विचारलं तेव्हा आपण इच्छुक आहात का, त्यांची इच्छा दिसली नाही. ते स्वतः उद्या उपस्थित राहतील. त्यावर आधी चर्चा होईल. शरद पवार हे देशातील सर्वोच्च नेते आहेत. हे मी माझं मत सांगितलं असं स्पष्टीकरण देखील राऊत यांनी दिलं आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पवार देखील येणार आहेत. आम्हालाही निमंत्रण आहे, या बैठकीत पुढील रणनीती काय असेल ते उद्या निश्चित होईल असही राऊत यांनी सांगितलं.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.