नासाने हिंदु धर्माला टार्गेट केलं? नासाच्या त्या ट्विटमुळे नवा वाद

नासाच्या फोटोमुळे नवा वाद निर्माण झालाय. काहींनी याचं समर्थन केलं तर काहींनी टीका केली. काहींनी याला हिंदु धर्माला टार्गेट करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.
नासाने हिंदु धर्माला टार्गेट केलं? नासाच्या त्या ट्विटमुळे नवा वाद
नासाने हिंदु धर्माला टार्गेट केलं? नासाच्या त्या ट्विटमुळे नवा वाद@NASA

अमेरिकेची अंतराळ संशोधन कंपनी NASA नॅशनल एरोनॉटिक्स अॅन्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन' अर्थात नासा ही जगातील सर्वोच्च अंतराळ संस्था आहे. चंद्रावर पहीले पाऊल ठेवणे असो किंवा मंगळावर अंतराळ मोहीमा असो, सर्वच बाबतीत नासा जगात अग्रेसर आहे. त्यामुळे या संस्थेत काम करण्याचं अनेकांच स्वप्न असतं. अनेक भारतीय लोक यात कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थी याठिकाणी इंटर्नशीप NASA internship करतायत. नासाच्या अशाच एका इंटर्नशीपच्या जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झालाय.NASA targeted Hindu Dharma? That NASA tweet caused a new controversy

ट्विटरवर पोस्ट केलेल्या चार फोटोंपैकी एका फोटोत प्रतिमा राय indian girl pratima ray नावाची भारतीय वंशाची मुलगी आहे. या फोटोत तिच्या कपड्यांवर आणि लॅपटॉपवर नासाचा लोगो nasa logo दिसतोय आणि मागे भिंतीवर हिंदु देवी - देवतांचे hindu gods फोटाज् आणि टेबलावर देवतांच्या प्रतिमा दिसतायत. या फोटोत सरस्वती, दुर्गा, राम-सीता यांचे फोटो आहेत. तर एक शिवलिंग ठेवलं आहे. याच फोटोमुळे नवा वाद निर्माण झालाय. काहींनी याचं समर्थन केलं तर काहींनी टीका केली. काहींनी याला हिंदु धर्माला टार्गेट करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.

हे देखील पहा -

विज्ञान आणि धर्म science and religion कधीही एकत्र राहू शकत नाही अशा टीका काहींनी केल्या, तर आपल्या धर्माचे पालन करण्यात काही गैर नाही असं म्हणत अनेकांनी याचं समर्थन केलं. या पोस्टमुळे दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. या पोस्टला हजारो लाईक्स आणि रिट्विट्स आले असून कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com