'या' कारणासाठी राहुल गांधींनी ईडीची चौकशी पुढे ढकलण्याची केली मागणी

गेल्या तीन दिवसांपासून राहुल गांधी यांची ईडी चौकशी सुरू आहे.
'या' कारणासाठी राहुल गांधींनी ईडीची चौकशी पुढे ढकलण्याची केली मागणी
Rahul GandhiSaam Tv

नवी दिल्ली : 'नॅशनल हेराल्ड' प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी ईडीची चौकशी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. राहुल गांधींनी सोनिया गांधी यांच्या आजारपणाचे कारण दिले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला विनंती करून राहुल गांधी यांनी सोमवारपर्यंत वेळ मागितला आहे. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली. ईडीच्या चौकशी विरोधात काँग्रेसने देशभरात या आंदोलन केले आहे. (National Herald Case)

Rahul Gandhi
राहुल गांधी देशाचा आवाज; सूडबुद्धीची कारवाई सहन करणार नाही - नाना पटोले

सोनिया गांधी कोरोना संसर्गामुळे आजारी आहेत. सध्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी ईडीची चौकशी संपल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) रुग्णालयात गेले होते. तिथे त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. याच प्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २३ जूनला हजर राहण्यास सांगितले आहे.

Rahul Gandhi
भारतीय गव्हामध्ये खरंच रुबेला विषाणू आहे का? तज्ज्ञांनी काय सांगितलं वाचा!

नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे?

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ मध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांवर फसवणूक आणि पैशाच्या गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडने ९०.२५ कोटी रुपये वसूल करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी केवळ ५० लाख रुपये दिले, असा आरोप केला आहे. (National Herald Case)

Rahul Gandhi
काँग्रेसच्या आंदोलनानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया, म्हणाले....

काँग्रेसचे राजभवनवर आंदोलन

केंद्रातील भाजपा सरकार काँग्रेस नेतृत्वाला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु अशा दबावाला अथवा दहशतीला आम्ही भीक घालत नाही. देशातील जनतेचे प्रश्न हाती घेत मोदी सरकारला सातत्याने कोंडीत पकडणारे राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देशाचा आवाज बनले आहेत. त्यांच्यावरील सूडबुद्धीच्या कारवाईमुळे काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. ही कारवाई आम्ही सहन करणार नाही, केंद्र सरकारविरोधात आमचा संघर्ष सुरुच राहिल असा इशारा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला.

केंद्र सरकारने राहुल गांधींविरोधात काँग्रेसकडून राजभवनवर धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पटोले प्रसार माध्यमांशी बोलते होते ते म्हणाले, 'राजकीय द्वेषातून भाजपा सरकार करत असलेल्या कारवाई विरोधात काँग्रेस (Congress) रस्त्यावर उतलेली असताना पोलीस बळाचा वापर करून मंत्री, खासदार, आमदार, महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com