राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित पवार नाराज? जयंत पाटलांचं नाव घेताच स्टेजवरुन गायब; पाहा Video

राष्ट्रवादीचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन आज राजधानी दिल्ली येथे पार पडलं. या दरम्यान राष्ट्रवादीच्या सर्व बड्या नेत्यांनी भाषण केले. मात्र, अजित पवार यांनी भाषण केलं नाही.
Ajit Pawar And Jayant Patil
Ajit Pawar And Jayant PatilSaam TV

शिवाजी काळे -

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे (NCP) आठवे राष्ट्रीय अधिवेशन आज राजधानी दिल्ली येथे पार पडलं. या दरम्यान राष्ट्रवादीच्या सर्व बड्या नेत्यांनी भाषण केले. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाषण केलं नाही. अजित पवार यांनी भाषण न केल्याने आता वेगळी चर्चा समोर आली आहे.

नक्की काय झालं?

अधिवेशन सुरू असताना समारोपाच्या भाषणासाठी शरद पवार (Sharad Pawar) बोलण्यासाठी उभे राहणार होते. त्या अगोदर अमोल कोल्हे यांच्या भाषणाची घोषणा करण्यात आली. तेव्हा प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील (Jayant Patil) भाषण करतील अशी घोषणा केली. तेव्हा अजित पवार यांना बोलायला संधी द्या, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी केल्या. त्यानंतर अजित पवार खुर्चीवरून उठून गेले.

पाहा व्हिडीओ -

जयंत पाटलांचं भाषण संपल्यानंतर अजित पवार यांच्या भाषणाची घोषणा करण्यात आली. ते बाहेर गेले असल्याचे सांगण्यात आले त्यानंतर अजित पवार उपस्थित नाहीत म्हणून तोपर्यंत राष्ट्रवादीच्या युथ कॉंग्रेसच्या झेंड्याची घोषणा झाली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हिंदी गाण्याचं उद्घाटन झालं.

तरीही अजित पवार न आल्याने शरद पवार भाषणाला उभे राहिले, दरम्यानच्या काळात व्यासपीठावरून बाहेर गेलेल्या अजित पवार यांना घेण्यासाठी सुप्रिया सुळे स्टेजच्या मागे गेल्या आणि अजित पवार यांना परत स्टेजवर घेऊन आल्या.

Ajit Pawar And Jayant Patil
Thackeray Vs Shinde: ठाकरे गटातील शिवसैनिकांना जामीन तर शिंदे गटातील आमदारावर गुन्हा दाखल

या सर्व प्रकरणावर अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, 'शरद पवार साहेबांची फेरनिवड झाली. सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह पवार साहेबांनी अध्यक्ष बनावं. पवार साहेबानी विनंती स्वीकारली. पवार साहेबांनी संसदेत विधानसभेत राष्ट्रीय राजकारणात काम केले आहे. नवीन पिढीला पुढे आणण्याचा प्रयत्न झाला पाहीजे असं ते म्हणाले.

दरम्यान, आजच्या सर्व वादावर त्यांना विचारलं असता ते म्हणाले, 'आज बरीच भाषणं झाली, वेगवेगळ्या मान्यवरांनी विचार मांडायचे असतात. सर्व दिग्गज बोलले हे राष्ट्रीय अधिवेशन होतं. कोरोनामुळे दोन वर्षे राष्ट्रीय अधिवेशन झालं नव्हतं म्हणून दिल्लीत अधिवेशन घेतलं असं म्हणत त्यांनी नाराजी नाट्याला बगल दिली.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com