नीरज चोप्राने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले; पानिपतमध्ये कुटुंबाने केला विजय साजरा

टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.
Neeraj Chopra
Neeraj ChopraSaam Tv

पानिपत: जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) घरात आनंदाचे वातावरण आहे. नीरजच्या या शानदार विजयाच्या आनंदात घरातील लोक एकमेकांना मिठाई खाऊ घालत आहेत. या ऑलिम्पिक चॅम्पियनच्या विजयाच्या आनंदात त्याच्या घरातील महिला आणि नातेवाईक गाताना आणि नाचताना दिसत आहेत.

यूजीन, यूएसए येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने ८८.१३ मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले. यापूर्वी २००३ मध्ये अंजू बॉबी जॉर्जने भारतासाठी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एकमेव पदक जिंकले होते. पॅरिस येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये लांब उडीत त्याने कांस्यपदक पटकावले.

Neeraj Chopra
Indrayani Expess News : 'या' तारखेपर्यंत पुन्हा 'इंद्रायणी एक्सप्रेस' रद्द; जाणून घ्या कारण
Neeraj Chopra
नीरज चोप्राने रचला इतिहास! वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकावर कोरले नाव

नीरज चोप्राने यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव रोशन केले होते. गेल्या वर्षी झालेल्या या जगातील सर्वोत्तम स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावले होते. यासह, नेमबाज अभिनव बिंद्रानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला.

नीरज चोप्राने रचला इतिहास!

टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने (Neeraj Chopra) जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. नीरजने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर भाला फेकला या भाल्याने त्याला रौप्य पदक मिळवून दिले आहे. या स्पर्धेचे सुवर्णपदक ग्रॅनाडा अँडरसन पीटर्सने ९०.५४ मीटर भालाफेक करून जिंकला आहे. (Neeraj Chopra Latest News)

नीरज चोप्राने (Neeraj Chopra) रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन नीरजने जागतिक स्पर्धेत दुसरे स्थान मिळवत रौप्य पदक जिंकले. या स्पर्धेचे सुवर्णपदक ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सने पटकावले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com