केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘नीट पीजी’ परीक्षा पुढे ढकलली; लवकरच नवीन तारीख जाहीर होईल

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परीक्षा 6 ते 8 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे.
NEET
NEETsaam tv

नवी दिल्ली- NEET PG परीक्षेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. या परीक्षेबाबद आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 12 मार्च रोजी होणारी NEET PG 2022 ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. याआधी ही परीक्षा आधी 12 मार्च रोजी होणार होती पण आरोग्य मंत्रालयाने ही परीक्षा आता 6 ते 8 आठवडे पुढे ढकलली असल्याची माहिती समोर आली आहे. (NEET PG exam 2022 postponed by Union Health Ministry)

हे देखील पहा -

NEET परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिक अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात 25 जानेवारीला दाखल केली होती. दरम्यान आज न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. 7 फेब्रुवारीला सुनावणी ही होती मात्र ती आधीच घेण्यात आली.

NEET
Bandatatya Karadkar: 'आलीया भाेगासी असावे सादर'

12 मार्च रोजी विविध केंद्रांवर ही होणार होती, परंतु आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परीक्षा 6 ते 8 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत उमेदवारांनी इंटर्नशिप पूर्ण होईपर्यंत परीक्षेची तारीख वाढवण्यात यावी, असा युक्तिवाद केला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उमेदवारांच्या बाजूने ही परीक्षा पुढे ढकलली आहे. उमेदवारांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com