NEET पदव्युत्तर पदवी परीक्षेची तारीख जाहीर

NEET पदव्युत्तर पदवी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.
 NEET पदव्युत्तर पदवी परीक्षेची तारीख जाहीर
NEET पदव्युत्तर पदवी परीक्षेची तारीख जाहीर Saam Tv

नवी दिल्ली : NEET पदव्युत्तर पदवी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. यानुसार, ११ सप्टेंबर २०२१ या दिवशी ही परीक्षा होणार असल्याचे, केंद्रीय आरोग्य मंत्री मनुसख मांडवीय यांनी ट्विटद्वारे हि मोठी घोषणा केली आहे. मेडिकलच्या पदव्युत्तर पदवीसाठीच्या कोर्सेससाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. NEET Post Graduate Exam Date Announced

हे देखील पहा-

आरोग्यमंत्री मांडवीय यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, नीट पोस्टग्रॅज्युएट परीक्षा ११ सप्टेंबर २०२१ दिवशी घेण्याचे आपण ठरवले आहे. यामुळे ही परीक्षा देणाऱ्या मेडिकलच्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा...

 NEET पदव्युत्तर पदवी परीक्षेची तारीख जाहीर
#NEET परीक्षा आता वर्षातून एकदाच..

याच दरम्यान, NEET पदवी परीक्षेची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे. ही परीक्षा १२ सप्टेंबर रोजी पूर्ण पार पडणार आहे. NEET परीक्षेची तारीख शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी १२ जुलै दिवशीची जाहीर केली आहे. या परीक्षेकरिता नोंदणी अर्ज NEET च्या वेबसाईटवरती उपलब्ध असून, ६ ऑगस्ट ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. NEET Post Graduate Exam Date Announced

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com