Nepal Plane Crashed: नेपाळ विमान दुर्घटनेनंतर बचावकार्याचा थरारक VIDEO; नागरिकांची धावपळ अन्...

घटनास्थळी अद्यापही बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेनंतर सध्या विमानतळ बंद आहे.
Nepal Plane Carshed
Nepal Plane CarshedSaam TV

Nepal Plane Crashed: नेपाळमध्ये एक भीषण विमान अपघात घडला आहे. या अपघातात आतापर्यंत ३२ प्रवासांच्या मृत्यूची माहिती समोर येत आहे. काठमांडूहून येणारे विमान नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाचजवळ कोसळले.घटनास्थळी अद्यापही बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेनंतर सध्या विमानतळ बंद आहे.

विमान अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. विमानतळ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, फ्लाइटमध्ये ५३ नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, दोन कोरियन, प्रत्येकी एक आयरिश, अर्जेंटिनियन आणि फ्रेंच नागरिक होते. या घटनेचा आणि तेथील बचावकार्याचा थराराक  व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Nepal Plane Carshed
Nepal Aircraft Crash: मोठी बातमी! नेपाळमध्ये विमान कोसळलं, भीषण अपघातात 32 जणांचा मृत्यू; बचावकार्याला सुरूवात
Nepal Plane Carshed
Viral Video : लिफ्टच्या बटनांवर लघुशंका करणे पडले महागात; तरुणासोबत पुढे काय घडलं?

अपघाताबाबत माहिती देताना यती एअरलाइन्सचे प्रवक्त्यांनी सांगितलं की, यती एअरलाइन्सच्या विमानात एकूण ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. त्यात दोन मुलांसह 10 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हे विमान कोसळले.

दरम्यान, हवामान खराब असल्यानेही या विमानाचे उड्डाण करण्यात आले. यामुळेच हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. पोखरा विमानतळ डोंगराने वेढलेले आहे. त्याचबरोबर हवामानही खराब होते. तरीही उड्डाण करण्यात आल्याने हा अपघात घडल्याचीही माहिती समोर आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com