Crime News : बाबो! 6 मुलांच्या बापाने केलं एका तृतीयपंथाशी लग्न; पत्नीला सोबत केलं भयकंर कृत्य

New Delhi News : आरोपी घटनास्थळावरून फरार असून पोलीस त्याच्या शोध घेत आहेत.
New Delhi News
New Delhi News Saam Tv

New Delhi Crime News : राजधानी नवी दिल्लीतील भजनपुरा भागात एका महिलेसोबत तिहेरी तलाकचे प्रकरण समोर आले आहे. भजनपुरा पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. मात्र पोलीस त्याच्या शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

New Delhi News
Devendra Fadnavis : विरोधकांना माफ केलं आणि कटुता संपवली! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

पीडित महिला भजनपुरा भागातील रहिवासी आहे. महिलेने दिलेल्या तक्ररारी म्हटले आहे की, 32 वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते आणि आता तिला 6 मुले आहेत. ज्यामध्ये 4 मुली आणि 2 मुले आहेत. महिलेचा आरोप आहे की तिच्या पतीने तिला सोडून एका तृतीयपंथाशी लग्न केले आहे.

मात्र, सामाजिक दबावामुळे त्याने तृतीयपंथाला सोडून दुसऱ्या महिलेशी लग्न (Marriage) केल्याचे सांगण्यात येत आहे. या लग्नापासून तिचा पती तिच्यावर घर सोडण्यासाठी दबाव आणत होता आणि घर न सोडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देत ​​होता. 7 जुलै 2022 रोजी तिच्या पतीने तिला तीन वेळा 'तलाक तलाक तलाक' म्हणत घर सोडण्यास सांगितले होते.

New Delhi News
Mumbai KYC Fraud: मुंबईकरांनो KYC फ्रॉड पासून सावधान; ८ दिवसात ६० मुंबईकर अडकले जाळ्यात

महिलेच्या तक्रारीच्या आधारे भजनपुरा पोलीस (Police) ठाण्यात मुस्लिम महिलांच्या विवाह हक्क संरक्षण कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिचा नवरा तिच्यावर अत्याचार करतो आणि मुलांच्या संगोपनासाठी पैसेही देत ​​नाही. 

त्याचवेळी, या प्रकरणात आरोपी पतीचे म्हणणे आहे की, पत्नीने लावलेले सर्व आरोप खोटे आहेत.  पत्नी प्रॉपर्टीसाठी हे सर्व करत आहे. घर आपल्या नावावर करण्यासाठी पत्नी दबाव टाकत आहे. त्याने कधीही आपल्या पत्नीला तिहेरी तलाक दिला नाही आणि तिच्या पतीला कधीही त्रास दिला नाही असा आरोप पटीने केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com