Omicron New Guidelines: ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आले आहेत.
Omicron New Guidelines: ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स
Omicron New Guidelines: ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राने जारी केल्या नव्या गाईडलाईन्सSaam Tv

वृत्तसंस्था: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल कोरोना महासाथीच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना (New Guidlines) जारी करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) लहान मुले आणि किशोरवयीन (१८ वर्षाखालील) मुलांकरिता कोरोनाच्या (Corona) व्यवस्थापनाकरिता सर्वसमावेशक सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले आहेत. ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्कची (mask) शिफारस करण्यात येत नसल्याची आरोग्यमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. शिवाय ६ ते ११ वयोगटामधील मुले पालकांच्या थेट देखरेखीखाली सुरक्षित आणि योग्य पद्धतीने मास्क वापरू शकतात, असे देखील त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

कोरोना विषाणूच्या संसर्गाची गंभीरता बघता १८ वर्षांखालील मुलांकरिता अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरण्याची शिफारस करण्यात आली नाही. जर स्टिरॉइड्स वापरले गेले असतील, तर ते १० ते १४ दिवसांत क्लिनिकल सुधारणेच्या आधारे त्याचे डोस कमी करण्यात गेले आहे, असेही सरकारकडून (government) सांगण्यात आले आहे. १२ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना प्रौढांप्रमाणे मास्क घालावे लागणार आहे, असे देखील आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

ओमायक्रॉनच्या (omicron) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या (patients) लक्षात घेत तज्ञांच्या गटाद्वारे मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन केले गेले पाहिजे. ओमायक्रॉन हा कमी गंभीर आहे, हे इतर देशांचा उपलब्ध असलेल्या डेटावरून दिसून येत आहे. परंतु महासाथीच्या पार्श्वभूमीवर याकडे काळजीपूर्वक निरिक्षण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

Omicron New Guidelines: ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स
Satara: पोटच्या लेकरासाठी बाप भिडला बिबट्याशी

मार्गदर्शक सूचना

-५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क अनिवार्य नाही.

-१२ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाची मुले प्रौढांप्रमाणेच मास्क वापरणे.

-१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अँटिव्हायरल मोनोक्लोनरल अँटिबॉडीचा सल्ला देण्यात येत नाही.

-कोरोनाच्या माईल्ड केसेसमध्ये स्टेरॉईड्सचा वापर घातक.

-कोरोनासाठी स्टेरॉईड्सचा वापर योग्य वेळेस करणे आवश्यक आहे. योग्य डोस देणे देखील आवश्यक आहे.

-मुलांमध्ये कोणतीही लक्षणे नसली किंवा माईल्ड केस असल्यास त्यांना रुटीन चाईल्ड केअर मिळणे आवश्यक राहणार. जर योग्य असेल तर लस देखील दिली गेली पाहिजे.

-मुलांना रुग्णालयातून सुट्टी दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे काऊन्सिलिंग केले जावे. त्यांना मुलांची काळजी कशी घ्यावी आणि श्वसनासंबंधी समस्यांविषयी माहिती दिली जावी.

-कोरोनाच्या उपचारादरम्यान जर कोणत्याही मुलाच्या शरीराच्या कोणत्याही भागात समस्या आली तर त्यावर योग्य उपचार दिले जावे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.