पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत

सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर सकाळी 6 वाजता जाहीर केले आहे.
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत
Petrol Price Today, Diesel Price Today, Fuel Rate Today Saam Tv

नवी दिल्ली - कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा एकदा प्रति बॅरल 110 डॉलर च्या जवळ पोहोचल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर सकाळी 6 वाजता जाहीर केले आहे. आजही तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. (Petrol Price Today)

6 एप्रिल रोजी तेलाच्या किंमतीत 80 पैशांनी वाढ झाली होती तेव्हापासून सलग आज 37 व्या दिवशीही पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. ही सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा विषय आहे.

राजधानी दिल्लीत आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. राजधानीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 105.41 रुपये तर 1 लिटर डिझेलची किंमत 96.67 रुपये आहे.

हे देखील पाहा -

देशामधील महत्त्वाच्या शहरांमधील आजचे पेट्रोलचे दर

राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलचा दर 122.93 रुपये आणि डिझेलचा दर 105.34 रुपये लिटर आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये लिटर आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पेट्रोलचा दर 118.14 रुपये तर डिझेलचा दर 101.16 रुपये प्रति लिटर आहे.

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 118.03 रुपये आणि डिझेल 100.92 रुपये दराने विकले जात आहे.

झारखंडची राजधानी रांचीमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 108.71 रुपये आणि डिझेल102.02 रुपये आहे.

बिहारची राजधानी पटनामध्ये पेट्रोल 116.23 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 101.06 रुपयांना विकले जात आहे.

चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 110.85 रुपये आणि डिझेलची किंमत 100.94 रुपये आहे.

Petrol Price Today, Diesel Price Today, Fuel Rate Today
कोरोनाकाळात सायकलची मागणी वाढली, किंमतही वाढ

बंगळुरूमध्ये पेट्रोल 111.09 रुपये प्रति लीटर, तर डिझेलचे दर 94.79 रुपये आहे.

कोलकात्यात पेट्रोल 115.12 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 99.83 रुपये दराने विकले जात आहे.

दिल्लीत आज पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये आहे.

आग्रामध्ये पेट्रोल 105.03 रुपये आणि डिझेल 96.58 रुपये प्रति लिटर आहे.

लखनऊमध्ये पेट्रोल 105.25 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.83 रुपये प्रति लिटर आहे.

अहमदाबादमध्ये आज पेट्रोल 105.08 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 99.43 रुपये दराने विकले जात आहे.

चंदीगडमध्ये पेट्रोलची किंमत 104.74 रुपये प्रति लीटर आहे आणि डिझेल आज 90.83 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.