पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर! टाकी फुल्ल करण्यापूर्वी एकदा दर तपासा
नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलचे (Diesel) आजचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहे. नवीन अपडेटनुसार, आजही पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत चढ-उतार होत असताना आज, बुधवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाहीर केले आहेत. (Petrol Rate Today)
हे देखील पाहा -
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईसह सर्व शहरांमध्ये राष्ट्रीय स्तरावर आजही तेलाच्या किंमती स्थिर ठेवल्या आहेत. इंडियन ऑइल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या ताज्या अपडेटनुसार, दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.10 रुपये प्रति लिटर आणि नोएडामध्ये 96.92 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याच वेळी, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 96.57 रुपये आहे.
याशिवाय देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल केवळ 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचवेळी मुंबईत पेट्रोल 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.
प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
> भोपाळमध्ये पेट्रोल 108.65 रुपये आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर आहे.
> लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर आहे.
> पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर आहे.
> पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
> तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर आहे.
> रांचीमध्ये पेट्रोल 99.84 रुपये आणि डिझेल 94.65 रुपये प्रति लिटर आहे.
> बंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर आहे.
> चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.