
नवीन संसद भवनातील कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेसकोड देण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर रोजी नवीन संसद भवनात पूजेनंतर प्रवेश करण्यात येईल. त्यानंतर येथील कर्मचारी नव्या ड्रेसकोडमध्ये दिसणार आहेत. १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत अधिवेशन सुरू राहणार आहे. (Latest Marathi News)
१८ सप्टेंबर रोजी जुन्या संसदेत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जुन्या संसदेतील आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. दुसऱ्या दिवशी नवीन संसद भवनात प्रवेश केल्यावर दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीची शक्यता आहे. नव्या संसद भवनातील जागा जास्त आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे सदस्य एकाचवेळी बसू शकतात.
नव्या संसदेतील कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेसकोड आहे. यात खाकी पॅन्ट, गुलाबी रंग आणि कमळाचं फुल असलेला नवा ड्रेसकोड आहे. हा ड्रेसकोड नॅशनल इन्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी म्हणजेच एनआयएफटीने डिझाइन केलाय.
मार्शल कर्मचाऱ्यांचा ड्रेसकोड बदलणार
दोन्ही सभागृहांच्या मार्शल कर्मचाऱ्यांचा ड्रेसकोड बदलला जाणार आहे. मार्शलसाठी मणिपुरी पगडी तसेच आधिच्या सूटमध्ये बदल करत कमांडो केमोफ्लॉज ड्रेस देण्यात येणार आहे.
नव्या संसद भवनासाठी निवडण्यात आलेल्या ड्रेसकोडवर कमळाचे फुल असल्याने काँग्रेसह अन्य विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केलेत. वाघ किंवा मोर यांचा फोटो का ठेवला नाही? कमळाचाच फोटो का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.